Budget 2024 : पहिला जॉब आणि PF खात्यात पडणार 15 हजार रुपये, काय आहे नेमकी योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मचे बजेट सादर केले आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तरुणांसाठी रोजगार पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे..
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. सरकारने कृषी उत्पन्न वाढविण्याच्या योजना सादर केल्या तसेच बिगर शेती व्यवसायासाठी मुद्रा लोन अंतर्गत वीस लाखाचे कर्ज देण्याची देखील घोषणा केली. तरुणांसाठी देखील मोठी योजना जाहीर केली आहे. देशात प्रथमच नोकरीत प्रवेश करणाऱ्या तरुणांना अतिरिक्त पीएफ योजना देण्याची घोषणा केली आहे. या योजनेत सरकार स्वत:हून पहिली नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात 15 हजाराचा हप्ते जमा करणार आहे.
सरकारची योजना
सरकारने नऊ प्राथमिकता निश्चित केल्या आहेत. कृषी उत्पादन वाढविण्यावर भर, रोजगार आणि कौशल्य, सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, मॅन्युफॅक्चरींग आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, शहरांचा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्वोशन आणि रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट आणि पुढच्या पिढीसाठी सुधारणा योजना.
सरकारची दुसरी प्राथमिक प्राथमिक रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत माहिती दिली आहे. सरकारने रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी तीन योजनांचा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत पीएफचा अतिरिक्च फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले की सरकार पहिल्यांदाच वर्कफोर्सचा हिस्सा होणाऱ्या तरुणाच्या पीएफ खात्यात थेट 15 हजार रुपये जमा करणार आहे. या योजनेचा फायदा तीस लाख तरुणांना होण्याची शक्यता आहे.
मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात रोजगार
केंद्र सरकारला या योजनांमुळे देशात रोजगार वाढण्याची आशा आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन मिळणार आहे, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांन केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी या कंपन्यांना 2 वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपयांची ( रिम्बर्समेंट )प्रतिपूर्ती रक्कम मिळेल.याचा फायदा 50 तरुणांनै लोकांना होणार आहे.
नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे बांधली जातील
नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याची घोषणा केली आहे. देशातील विविध भागात नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पावलामुळे महिलांना कर्मचारी वर्गात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे म्हटले जात आहे.