पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा वाढविली, पाहा अर्थसंकल्पात काय झाली घोषणा

आजकाल तरुणांना छोटा उद्योगधंदा उभारण्यासाठी भांडवल हीच मुख्य समस्या असते. मुद्रा योजनेपूर्वी बॅंकांकडून कर्ज मिळण्यासाठी खूप कागदपत्रांची मागणी केली जात होती. पंतप्रधान मुद्रा योजना ( PMMY ) नेमकी काय आहे ते पाहूयात...

पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा वाढविली, पाहा अर्थसंकल्पात काय झाली घोषणा
nirmala sitharaman Budget 2024
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 12:29 PM

देशाचा अर्थसंकल्प 2024 आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे.या अर्थसंकल्पात युवकांना रोजगार मिळाल्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात पंतप्रधान मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. मुद्रा योजनेंतर्गत आता तरुणांना 20 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. काय ही योजना पाहूयात….

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात वेगाने वाढणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेत नवनवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा देखील 20 लाखापर्यंत वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या मुद्रा योजनेतर्गत आधी 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता त्यात शंभर टक्के वाढ करण्यात आली आहे. काय आहे ही पंतप्रधान मुद्रा योजना पाहूयात.

पंतप्रधान मुद्रा योजना ( PMMY ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरु केली होती. या योजनेंतर्गत बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती लघु सुक्ष्म उद्योगांना 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेत या कर्जाला मुद्रा योजना असे नाव दिले आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला ज्याच्याकडे उत्पादन प्रक्रिया व्यापार किंवा सेवा क्षेत्रासारख्या बिगर शेती उत्पन्न देणारा उद्योग आहे त्यांना आता 20 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. मुद्रा कर्जासाठी बँक, MFI वा एनबीएफसी या संस्थांशी संपर्क साधता येतो.

काय आहे पंतप्रधान मुद्रा योजना ( PMMY ) ?

या मुद्रा योजनेत एक ते पाच वर्षांच्या परतफेडी च्या अटींवर कर्ज काढता येते. व्यवसाय वाढीसाठी तीन विविध टप्प्यांवर कर्ज मिळते. कर्जाचा प्रकार आणि लागू असलेल्या पंतप्रधान मुद्रा योजना व्याजदरावर आकारला जातो.पीएमएमवायचे पूर्ण नाव मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी असे आहे. सुलभ कर्ज मिळाल्यास तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा मिळते म्हणून ही योजना आणली आहे. कारण तरुणांना व्यवसाय उभारताणा भांडवल हीच मुख्य समस्या असते. मुद्रा योजनेपूर्वी बॅंकांकडून कर्ज मिळण्यासाठी खूप कागदपत्रांची मागणी केली जात होती. त्यामुळे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना खूप अडचणी येत होत्या. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी एक महत्वाची अर्थ सहाय्य योजना आहे. हीची कर्ज मर्यादा 20 लाख केल्याने तरुणांना फायदा होणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.