जिथं इंदिरा गांधींनी सभा घेतली होती, तिथेच राहुल गांधी विजयाचे रणशिंग फुंकणार…

मध्य प्रदेशात ज्या वेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी प्रचाराल आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खुल्या जीपमधून बुरहानपूर, नेपानगर आणि खांडवामध्ये शिवकुमार सिंह यांच्या समर्थनाथ त्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

जिथं इंदिरा गांधींनी सभा घेतली होती, तिथेच राहुल गांधी विजयाचे रणशिंग फुंकणार...
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 12:32 AM

नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील पुढील प्रवास हा मध्य प्रदेशातून जाणार आहे. बुरहानपूर जिल्ह्यापासून मध्य प्रदेशात ही भारत जोडो यात्रा प्रवेश करणार आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुकांना अजून वर्षभराचा कालावधी असतानाही काँग्रेसने आता पासूनच त्या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रमुख कमलनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, प्रभारी महासचिव प्रियंका गांधी आपल्या संपूर्ण कुंटुंबीयासह पहिल्यांदाच त्या पदयात्रेत सामील होत आहेत.

त्यांनी सांगितले की, प्रियंका गांधी बुरहानपूरपासून इंदौरपर्यंत 24 आणि 25 रोजी त्या यात्रेत आपला सहभाग नोंदविणार आहेत.

भारत जोडो यात्रेनिमित्ताने गांधी-नेहरू कुटुंबातील राहुल गांधी हे चौथे व्यक्ती आहेत जे बुरहानपूरमध्ये येत आहेत. 41 वर्षापूर्वी 1980 मध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीही या जिल्ह्यात आल्या होत्या.

त्यावेळी इंदिरा गांधींनी रात्रीचे 2 वाजलेले असताना त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी निवडणुकीच्या सभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्या खांडवा लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार ठाकूर शिवकुमार सिंह यांच्या समर्थनात त्यांनी प्रचार केला होता.

त्यावेळी इंदिरा गांधी त्यांच्या घरी तीन दिवस थांबल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्याने ठाकूर कुटुंबीय तीन पिढ्यांच्या आठवणी असणारा फोटो त्यांना भेट देणार आहेत.

मध्य प्रदेशात ज्या वेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी प्रचाराल आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खुल्या जीपमधून बुरहानपूर, नेपानगर आणि खांडवामध्ये शिवकुमार सिंह यांच्या समर्थनाथ त्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. इंदिरा गांधी यांचा दौरा असताना लाखोंच्या संख्येने लोक त्यांना ऐकण्यासाठी येत होते.

त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रभावामुळे त्याकाळचे भाजपचे नेते कुशाभाऊ ठाकरे हे पराभूत झाले होते. स्वर्गीय ठाकूर शिवकुमार सिंह यांचे छोटे भाऊ ठाकुर सुरेंद्र सिंह उर्फ शेरा भैया सांगतात की, आमचे आणि गांधी घराण्याचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. त्यामुळेच ते ठाकूर शिवकुमार सिंह कुटुंबीय राहुल गांधी यांना तीन पिढ्यांचा असलेला फोटो ते भेट देणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.