मध्य प्रदेशात बस 30 फूट खोल कालव्यात कोसळली; 35 प्रवाशांचा बुडून मृत्यू

बस कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवले. | Bus accident

मध्य प्रदेशात बस 30 फूट खोल कालव्यात कोसळली; 35 प्रवाशांचा बुडून मृत्यू
ही बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:41 PM

भोपाळ: मध्य प्रदेशातील रामपुर नैकिन येथे मंगळवारी बस 30 फूट खोल कालव्यात कोसळून भीषण अपघात (Road Accident) झाला. या बसमध्ये जवळपास 54 प्रवासी होती. यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले असून अद्याप 47 प्रवाशी बेपत्ता आहेत. (Major Accident in Madhya pradesh bus fall into canal)

ही बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बस कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवले. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, उर्वरित 47 प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळत आहे. तर उर्वरित लोकांचा सध्या शोध घेतला जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. ही बस क्रेनच्या साहाय्याने कालव्याच्या बाहेर काढली जात आहे. यामध्ये काही प्रवाशांचे मृतदेह असण्याची शक्यता आहे.

बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनेची माहिती घेतली असून जिल्हाधिकाऱ्य़ांशी चर्चा केली आहे.

पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली

जळगावात सोमवारी ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले होते. या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हेलावले आहेत. मराठीतून ट्विट करत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला होता. महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला . शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या:

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

भररस्तात एसटी बसच्या चाकाचे नटबोल्ट गायब, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरुच

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

(Major Accident in Madhya pradesh bus fall into canal)

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.