वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे वेगवेगळे नियम पाळण्याची सक्ती केली जाते. वाहन चालकाने हेल्मेट घालणंही सक्तीचं करण्यात आलंय. पण बसचालकांनी हेल्मेट घालावं असा नियम अजून तरी झालेला नाही. यातच एका बसचालकाचा हेल्मेट घातलेला व्हिडिओ सध्या तुफ्फान व्हायरल होतोय. कारणही तसंच आहे. हा व्हिडिओ केरळचा असल्याचा दावा केला जातोय.
देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेविरोधात गृह मंत्रालयानं मोहीम सुरु केली आहे. आज तर या संघटनेवर बंदीच घातली आहे. दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचा आरोप या संघटनेच्या सदस्यांवर केला जातोय.
मात्र देशात अनेक ठिकाणी पीएफआयच्या सदस्यांनी या कारवाईचा विरोध केलाय. केरळमध्येही पीएफआयने या कारवाईवरून बंदचा नारा दिला होता. पण ज्यांनी या बंदला प्रतिसाद दिला नाही, त्या वाहनांवर हल्ले करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
A KSRTC driver drives his bus wearing a helmet in order to save his head from stone throwing by hartal supports. #PFI Hartal in Kerala. Widespread attack against KSRTC buses @CMOKerala pic.twitter.com/Ija74NPmkA
— Dhinesh Kallungal (@Dineshkallungal) September 23, 2022
संघटनेनं केलेल्या आवाहनाला दाद न देणाऱ्या वाहनांवर हल्ले करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्यात काही बसच्या खिडक्या फुटल्या. ह्या सर्व घटनांमध्ये स्वतःला सुरक्षित करण्यासाठी बस ड्रायव्हर हेल्मेट घालून बस चालवत आहे, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ड्रायव्हरचा व्हिडिओ शेअर करून अनेकांनी हसावं की रडावं, असा प्रश्न उपस्थित केलाय.