Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Low Price | स्वस्तात मिळवा बंगला, फ्लॅट, दुकान, या बँकाने आणली ऑफर खास

Home Low Price | तुम्हाला स्वस्तात बंगला, सदनिका, दुकान, घराची खरेदी करता येईल, ते पण घर बसल्या. या बँकेने त्यासाठी खास ऑफर आणली आहे. बँकेने दिलेल्या अधिकृत साईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यांच्या यादीत तुमचे आवडते शहर असेल आणि हव्या त्या परिसरातील घर उपलब्ध असल्यास त्यासाठी तुम्हाला दावा सांगता येईल, बोली लावता येईल..

Home Low Price | स्वस्तात मिळवा बंगला, फ्लॅट, दुकान, या बँकाने आणली ऑफर खास
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 3:55 PM

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : दुकान, घर, फ्लॅट, कार्यालय अथवा औद्योगिक भूखंड स्वस्त किंमतीत तुम्हाला खरेदी करता येईली. ही बातमी त्यादृष्टीने तुमच्या एकदम कामाची आहे. बँक ऑफ बडोदाने त्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. तुमच्या शहरातील मालमत्ता यामध्ये असेल आणि तुमच्या आवडीच्या परिसरात ही मालमत्ता असेल तर ही संधी चुकवू नका. ग्राहकाला घर बसल्या या योजनेचा लाभ घेता येईल. बँकेने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरुन त्या जागेसाठी दावा करता येईल. बोली लावता येईल, काय आहे ही ऑफर

ई-ऑक्शन करणार बँक

बँक ऑफ बडोद्याकडे अनेक मालमत्ता तारण आहेत. ज्या ग्राहकांना बँकेचे हप्ते चुकते करता आले नाही. त्यांना संधी देऊनही त्यांनी मालमत्तेवरील कर्ज फेडले नाही. त्यांची मालमत्ता बँक लिलावाद्वारे विक्री करत आहे. ज्यांना स्वस्तात घर हवे आहे, त्यांच्यासाठी ही ऑफर खास आहे. या मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेत तुम्हाला सहभागी होता येईल. संपूर्ण देशात बँकेने ई-लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी या मेगा ई-निलामी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आहे. तुमच्या आवडत्या शहरातील मालमत्ता तुम्हाला खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा

अनेक श्रेणीतील मालमत्ता करा खरेदी

बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटनुसार, या मेगा ई-ऑक्शनमध्ये ही बँक, घर, फ्लॅट, कार्यालयीन जागा, भूखंड, औद्योगिक मालमत्तेचा लिलाव करणार आहे. या सर्व मालमत्ता देशभर पसरल्या आहेत. या मालमत्तांची निलामी ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे सणासुदीत मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर या लिलाव प्रक्रियेत तुम्हाला हजेरी लावता येईल.

याठिकाणी मिळवा सविस्तर माहिती

ग्राहकांना या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी बँकेने वेबसाईटची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्राहकांना www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-notices या संकेतस्थळावर भेट देता येईल. या लिंकवर तुम्हाला लिलाव प्रक्रियेची इत्यंभूत माहिती मिळेल. आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळेल. तसेच सहभागी कसे व्हायचे याची माहिती मिळेल.

अनेकदा होते लिलाव प्रक्रिया

बँका वेळोवेळी अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव करतात. या ई-ऑक्शनमध्ये बँका त्या मालमत्तांची विक्री करतात, ज्या तारण टेवण्यात आलेल्या आहते, पण त्यावरील कर्जाची परतफेड करण्यात आलेली नाही. मालमत्ताधारकांना मालमत्ता विक्रीची नोटीस देण्यात येते. या लिलाव प्रक्रियेची माहिती देण्यात येते. त्यांचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यास ही मालमत्ता लिलाव करण्यात येते. बँके लिलावातून त्यांची रक्कम वसूल करतात.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.