केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक पत्र
वडिलांनी मला बर्याच वेळा पाटण्याला जाण्याचा सल्ला दिला, पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे शक्य नाही, असे चिराग पासवान म्हणतात
पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये दाखल आहेत. पासवान यांचे पुत्र आणि लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Cabinet Minister Ram vilas Paswan admitted to ICU)
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच लोक जनशक्ती पक्षाचा आधारस्तंभ असलेले रामविलास पासवान अतिदक्षता विभागात असल्याने समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वडिलांना अशा परिस्थितीत दिल्लीला सोडून आपल्याला बिहारला येणे शक्य नसल्याचे चिराग पासवान यांनी पत्र लिहून पक्षातील नेत्यांना सांगितले आहे.
केंद्रात ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्री विभागाची धुरा सांभाळणारे रामविलास पासवान राज्यसभा खासदार आहेत. आतापर्यंत तब्बल आठ वेळा त्यांनी लोकसभेवर खासदारकी भूषवली आहे.
चिराग पासवान यांचे भावनिक पत्र
“कोरोना संक्रमण काळात लोकांना रेशन मिळण्यास त्रास होऊ नये, म्हणून वडिलांनी नियमित आरोग्य तपासणी पुढे ढकलली. यामुळे ते आजारी पडले. गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात आहेत.” असे चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे
“मुलगा या नात्याने मी वडिलांना रुग्णालयात पाहून खूप अस्वस्थ होतो. वडिलांनी मला बर्याच वेळा पाटण्याला जाण्याचा सल्ला दिला, पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर रहावे अन्यथा तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वत:ला कधीही क्षमा करु शकणार नाही” असे भावनिक उद्गार चिराग पासवान यांनी काढले आहेत. (Cabinet Minister Ram vilas Paswan admitted to ICU)
“पक्षाध्यक्ष या नात्याने आपल्याला त्या सहकाऱ्यांचीही चिंता आहे, ज्यांनी आपले जीवन ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’साठी समर्पित केले आहे. आघाडीतील मित्रपक्षांशी बिहारच्या भवितव्याविषयी किंवा जागावाटपाबद्दल आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही.” असेही चिराग यांनी स्पष्ट केले.
लोक जनशक्ति पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान ने पत्र लिखकर जानकारी साझा करते हुए बताया कि उनके पिता (केंद्रीय मंत्री राम विलास पासवान) ICU में भर्ती हैं और ऐसे वक्त में उनका अपने पिता के साथ होना बेहद जरूरी है। (20.09) pic.twitter.com/rI0LUrvLFt
— ANI_HindiNews (@AHindinews) September 21, 2020
संबंधित बातम्या :
सुशांत सिंह आत्महत्येवरुन बिहारमध्ये संताप, चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
एनडीएच्या बैठकीत शिवसेनेची कमतरता, लोजप नेते चिराग पासवान यांच्या भावना
(Cabinet Minister Ram vilas Paswan admitted to ICU)