21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. (Cabinet Secretary on extending Lockdown)

21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 11:09 AM

नवी दिल्ली : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना केंद्राने मात्र ही शक्यता धुडकावून लावली आहे. ‘लॉकडाऊन वाढवण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. असे अहवाल वाचून मला आश्चर्य वाटले’ अशी प्रतिक्रिया कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी ‘एएनआय’ला दिली. (Cabinet Secretary on extending Lockdown)

भारतात रविवार संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरसचे एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याची सरकारी आकडेवारी आहे. भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रविवारपर्यंत 34 हजार 931 रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेतल्याचं सांगितलं.

केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना राज्य आणि जिल्हा सीमा सील करण्यास सांगितले आहे. ज्यांनी आधीच राहते ठिकाण सोडले आहे, त्यांना 14 दिवस विलग (क्वारंटाईन) ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित केलेल्या ‘मन की बात’ रेडिओ शोमध्ये देशभरात लॉकडाऊन जारी केल्यामुळे होणाऱ्या अडचणींसाठी देशवासियांची क्षमा मागितली. मात्र भारत देश जीवन आणि मृत्यू यांच्यात लढाई लढत असल्यामुळे हा निर्णय गरजेचा असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला होता.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल. (Cabinet Secretary on extending Lockdown)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.