राफेलबाबत CAG अहवाल राज्यसभेत सादर, UPA पेक्षा NDA चा करार स्वस्त
Cag Report on Rafale Deal नवी दिल्ली: देशभरात वादंग उठलेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी नियंत्रक- महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा (CAG) अहवाल आज राज्यसभेत मांडण्यात आला. केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांनी हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार मोदी सरकारने राफेल विमानांचा करार केला आहे, तो काँग्रेसप्रणित यूपीएपेक्षा स्वस्त असल्याचा दावा आहे. राफेल विमान 2.86 टक्के स्वस्त असल्याचं […]
Cag Report on Rafale Deal नवी दिल्ली: देशभरात वादंग उठलेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी नियंत्रक- महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा (CAG) अहवाल आज राज्यसभेत मांडण्यात आला. केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांनी हा अहवाल सादर केला. या अहवालानुसार मोदी सरकारने राफेल विमानांचा करार केला आहे, तो काँग्रेसप्रणित यूपीएपेक्षा स्वस्त असल्याचा दावा आहे. राफेल विमान 2.86 टक्के स्वस्त असल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. 126 विमानांचा कराराच्या तुलनेत भारताला सध्याच्या करारात 17.08 टक्के रुपयांचा फायदा झाला, असं या अहवालात नमूद आहे. तयार राफेल विमानाची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या इतकीच आहे. असं असलं तरी विमानाच्या किमती मात्र जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कॅगच्या अहवालामुळे विरोधकांप्रमाणे मोदी सरकारचा दावाही खोटा ठरला आहे. कारण मोदी सरकारने राफेल विमानं 9 टक्क्यांनी स्वस्त खरेदी केल्याचा दावा केला होता. मात्र कॅगच्या अहवालात विमानं 2.86 टक्क्यांनी स्वस्त खरेदी केल्याचं म्हटलं आहे.
CAG report tabled in Rajya Sabha today: The delivery schedule of the first 18 Rafale aircraft is better than the one proposed in the 126 aircraft deal, by five months. #RafaleDeal pic.twitter.com/9j3vE419sg
— ANI (@ANI) February 13, 2019
मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता.
कॅग रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?
-कॅग रिपोर्टमध्ये मोदी सरकारने राफेल विमाने 2.86 टक्के स्वस्त खरेदी केल्याचं म्हटलं.
-मोदी सरकारने केलेला करार हा तत्कालिन यूपीए सरकारच्या करारापेक्षा स्वस्त म्हणजे फायद्याचा आहे
-126 विमानांचा कराराच्या तुलनेत भारताला सध्याच्या करारात 17.08 टक्के रुपयांचा फायदा झाला.
-या रिपोर्टमध्ये 2007 आणि 2015 मधील किमतीचं तुलनात्मक विश्लेषण केलं आहे. बाजारभाव लक्षात घेऊन 2016 मध्ये जो करार झाला, त्यानुसार भारताला 2.86 टक्के कमी किमतीत राफेल लढाऊ विमान मिळालं.
जेटलींचं ट्विट
दरम्यान, कॅग रिपोर्ट राज्यसभेत सादर झाल्यानंतर, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्विट करुन, ‘सत्यमेव जयते- नेहमी सत्याचाच विजय होतो. राफेलबाबत कॅग रिपोर्टवरुन हे पुन्हा एकदा सिद्ध झालं” असं म्हटलं.
Satyameva Jayate” – the truth shall prevail. The CAG Report on Rafale reaffirms the dictum.
— Arun Jaitley (@arunjaitley) February 13, 2019
राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल लढाऊ विमान करारावरुन सातत्याने हल्ले सुरु आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. राफेल विमान घोटाळ्यात मोदींचा थेट सहभाग आहे. मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटी दिले. राफेलप्रकरणात मोदींकडून सौदेबाजी झाली”, असा हल्लाबोल राहुल गांधी सातत्याने करत आहेत.