संपूर्ण ट्रेन तुम्ही भाड्यानं घेऊ शकता का? किती खर्च येतो?
तुम्ही कधी हा विचार केला आहे का की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कारणासाठी संपूर्ण रेल्वे बुक करता येते का? त्यासाठी किती खर्च येऊ शकतो? याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
काळाच्या ओघात दळणवळच्या साधनाचा विकास होत गेला, जशी दळणवळाची साधनं वाढली तसा माणसाचा देखील विकास झाला. मानवी जीवन आधिक गतिमान झालं. पूर्वी बस, कार अशा वाहनांचा शोध लागला नव्हता, तेव्हा बैलगाडी, घोडा हेच मानवाच्या दळवळणाची साधणं होती. बैलगाडीतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणं किंवा घोड्यावरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागायचा. मात्र त्यानंतर हळूहळू वाहनांचा शोध लागला आणि मानवाच्या आयुष्यात गतिमानता निर्माण झाली, आधी बसचा शोध लागला नंतर वेगवेगळ्या कार बाजारात आल्या, ट्रेन धावू लागल्या, विमानाचा शोध लागला.
आज तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कारने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अवघ्या काही तासांमध्ये सहज पोहोचू शकता. विमानाने तर तुम्ही अवघ्या काही तासांमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात सहज पोहोचता. मात्र त्यासाठी तुम्हाला तिकिटासाठी मोठी किंमत मोजावी लागते. विमान प्रवास आजही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जर तुम्हाला लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर बसचा प्रवास तेवढा आरामदायी नसतो, बसचं तिकीट विमानाच्या तुलनेत कमी असते मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बसचा प्रवास हा आरामदायी ठरत नाही. दुसरीकडे तुम्ही विमानाने अवघ्या काही मिनिटांमध्ये इच्छित स्थळी पोहोचू शकता मात्र त्याच्या तिकिटाचे दर हे जास्त असतात.
अशावेळी ज्याला आपण सुवर्णमध्य म्हणतो ती म्हणजे भारतीय रेल्वे, रेल्वेचं तिकीट हे विमान आणि बसच्या तिकिटांपेक्षाही कमी असतं आणि तुम्ही खूप आरामात लाब पल्ल्याचा प्रवास देखील करू शकता. त्यामुळेच भारतामध्ये प्रवासासाठी सर्वात जास्त पसंती ही ट्रेनला मिळते, जगातलं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क हे आज भारताकडे आहे. तुम्ही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेने कुठेही प्रवास करू शकता. ते पण खूप कमी दरामध्ये.
मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की जसं तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी बसचं बुकिंग करता, एखादं दुसरं वाहन बुक करता, लग्नासाठी हेलिकॉप्टर बुक करता तशी संपूर्ण ट्रेन देखील बुक करता येते का? तर याचं उत्त आहे, होय तुम्ही संपूर्ण ट्रेन देखील बुक करू शकता. तुम्हाला रेल्वे मंत्रालयाच्या वेबसाईटवरून रेल्वे बुक करता येते. यासाठी एका दिवसाला तुम्हाला 9 ते 10 लाख रुपये इतका खर्च येतो.