तुम्हाला रिल्स बनवता येतात? मिळणार 1,50,000 लाख रुपये; रेल्वेची खास ऑफर

जर तुम्ही चांगले रील्स बनवू शकत असाल किंवा तुम्हाला फिल्म बनवायची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही देखील दीड लाख रुपये मिळू शकता.

तुम्हाला रिल्स बनवता येतात? मिळणार 1,50,000 लाख रुपये; रेल्वेची खास ऑफर
Railway
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 8:28 PM

जर तुम्ही चांगले रील्स बनवू शकत असाल किंवा तुम्हाला फिल्म बनवायची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला रील्सच्या माध्यमातून पैसे कमावण्याची मोठी संधी मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम (एनसीआरटीसी) च्या वतीनं नमो भारत शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकाला आयोजकांकडून तब्बल 1,50,000 लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक आपल्या रिल्सचा किंवा शॉर्ट फिल्मचा विषय स्वत:निवडू शकतात. त्याचं कथानक ठरवण्याचा अधिकार देखील त्यांना आहे. मात्र यात एकच अट आहे ती म्हणजे शॉर्ट फिल्म बनवताना, आरआरटीएस स्टेशन आणि नमो भारत ट्रेन हे क्रिएटीव्ह स्वरुपात दिसले पाहिजे.

नि:शुल्क प्रवेश

आरआरटीएस स्टेशन आणि नमो भारत ट्रेन हे प्रवाशांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदु आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज देण्याची गरज नाही. याचाच अर्थ तुम्ही एकही रुपया न भरता अगदी मोफत या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. फक्त गरज आहे ती तुमच्यामधील गुणवत्ता दाखवण्याची. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदी भाषेत अर्ज करावा लागणार आहे. तसेच या शॉर्ट फिल्मचं चित्रिकरण देखील हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करावं लागणार आहे. या फिल्मचा फॉरमॅट हा MP4 1080p असा असावा, असं एनसीआरटीसीने म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांनाही होता येणार सहभागी

दरम्यान या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकता. पहिल्या तीन क्रमाकांसाठी बक्षिस ठेवण्यात आलं आहे. प्रथम क्रमांकासाठी दीड लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी एक लाख तर तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजारांचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या शॉर्ट फिल्म या एनसीआरटीसीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील दाखवण्यात येणार आहेत.

असा करा अर्ज

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला एनसीआरटीसीकडे एक अर्ज करावा लागणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला अर्जाचा विषय लिहिताना “नमो भारत शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेसाठी अर्ज असं लिहावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शॉर्ट फिल्मची कथा जास्तीत जास्त शंभर शब्दात लिहावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला pr@ncrtc.in या मेल आयडीवर मेल करायचा आहे. वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी अर्ज करू शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.