Canda RSS : आगीत तेल ओतले! RSS वर कॅनडा सरकारची बंदी?

Canda RSS : भारत-कॅनडामध्ये संबंध चांगलेच ताणले असताना आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर कॅनडा सरकारने बंदी घातल्याची बातमी व्हायरल झाली आहे. या वृत्तामुळे एकच खळबळ माजली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, खरंच कॅनडा सरकारने असे काही पाऊल टाकलं आहे का? त्याचा हा घेतलेला पडताळा..

Canda RSS : आगीत तेल ओतले! RSS वर कॅनडा सरकारची बंदी?
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 9:26 AM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणाऱ्या कॅनडा सरकारच्या उलट्याबोंबामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेले आहेत. ते तुटण्यापर्यंत ताणल्या गेले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या भारत सरकारने घडवून आणल्याचे विश्वसनीय कारणं समोर आल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांनी केला होता. भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. त्यानंतर भारताने कॅनडाला त्यापेक्षाही खरमरीत उत्तर दिले. आता भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कॅनडा सरकारने बंदी (Canda Ban RSS) घातल्याच्या बातम्यांनी वातावरण आणखी तापवलं आहे. सध्या या वृत्तानं भारतासह जगभर धुमाकूळ घातला आहे. खरंच कॅनडा सरकारने आरएसएसवर बंदी घातली आहे का? या व्हायरल मॅसेजमागील सत्य तरी काय?

हे सुद्धा वाचा

काय आहे सत्यता

कॅनडा सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणल्याची बातमी व्हायरल झाली. पाकिस्तान मीडियातही त्याविषयी चर्चा झाली. गुगलवर अनेकांनी झटपट यासंबंधीची कीवर्ड सर्च करायला सुरुवात केली. पण याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. कॅनडा सरकारच्या कोणत्याही सरकारी प्रतिनिधीचे याविषयीचे कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. ट्विटर, फेसबूक वा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॅनाडा सरकारकडून याविषयीचे अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे व्हायरल मॅसेजमध्ये करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

कोण आहे NCCM

याविषयीच्या व्हायरल पोस्टमध्ये नॅशनल काऊंसिल ऑफ कॅनेडियन मुस्लीम ( NCCM) या संघटनेचे नाव पुढे आले. या संघटनेच्या मागणीनंतरच कॅनडा सरकारने आरएसएसवर बंदी आणल्याची वार्ता पसरल्याचा दावा करण्यात आला. या संघटनेने काय मागण्या केल्या, याविषयीचा तपशील पाहणे महत्वाचे ठरते.

काय आहे NCCM ची मागणी

युट्यूबवर नॅशनल काऊंसिल ऑफ कॅनेडियन मुस्लीमचे एक युट्यूब चॅनल आहे. ‘NCCMtv’ या युट्यूब चॅनलवर 20 सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लांबलचक आहे. या व्हिडिओतील व्यक्ती या संघटनेची प्रमुख आहे. एनसीसीएमचे सीईओ स्टीफन ब्राउन यांनी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणात कॅनडा सरकारे सत्यता समोर ठेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पण आहेत मागण्या

  • कॅनडा सरकारने भारतातील राजदूर तातडीने माघारी बोलवावा.
  • कॅनडातील भारतीय राजदूत संजय कुमार वर्मा यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी.
  • दोन्ही देशातील व्यापारावर लागलीच बंदी घालावी.
  • राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर तात्काळ बंदी घालावी.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.