Canda Khalistan : ही घ्या खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी! जस्टीन ट्रूडो काही आठवतं का

Canda Khalistan : खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर याच्यावर कॅनडात गोळीबार झाला होता. ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वारासमोर त्याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात तो मारला गेला. 18 जून 2023 रोजी ही घटना घडली. पण यात जस्टीन ट्रूडोचा कांगावा आणि कावेबाजपणा समोर आला आहे.

Canda Khalistan : ही घ्या खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी! जस्टीन ट्रूडो काही आठवतं का
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 2:41 PM

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : पाकिस्तानच्या चिथावणीवरुन भारताविरोधात कारवाया करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाली. त्याची कड घेत कॅनडाचे पंतप्रधान भारताविरोधात गरळ ओकत आहेत. निज्जर हा कॅनडाचा नागरीक असल्याचा कांगावा करत भारताने ही हत्या घडवल्याचा आरोप पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांनी केला आहे. भारताने त्याला खरमरीत उत्तर दिले आहे. दोन्ही देशातील संबंध टोकाचे झाले आहेत. कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी (Khalistan Terrorist) उघड उघड भारतीयांना देश सोडून जाण्याच्या धमक्या देत आहेत. पण ट्रूडो मूग गिळून आहेत. आता एका यादीमुळे ट्रूडोचा कांगावा आणि कावेबाजपणा उघड झाला आहे.

निज्जरची हत्या

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो मुळचा पंजाब राज्यातील आहे. जालिंधर जवळ त्याचे गाव आहे. हिंदू पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) सक्रीय झाल्यानंतर तो कॅनडात पळाला. ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वारासमोर त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. 18 जून 2023 रोजी तो मारल्या गेला.

हे सुद्धा वाचा

हे आहेत दहशतवादी 

  1. गुरुजीत सिंग चिम्मा : हा मुळचा गुरुदासपूरचा रहिवाशी आहे. तो कॅनडातील Brampton याठिकाणी राहतो. तो ‘Singh Khalsa Sewa Club’ सदस्य आहे. पंजाबमध्ये सुपारी घेऊन हत्याकांड घडविण्यात याचा मोठा हात उघड झाला आहे. पंजाबमधील काही तरुणांना पाकिस्तानमध्ये त्याने प्रशिक्षण दिले आहे.
  2. गुरप्रीत सिंग : हा पंजाबमधील मोगा येथील रहिवाशी आहे. तो कॅनडातील Ontario येथे राहतो. तो टोरंटोतील Singh Khalsa Sewa Club चा सदस्य आहे. खलिस्तान चळवळीसाठी गुरुजीत सिंग चिम्मासोबत फंडिंग जमविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे.
  3. हरदीप सिंग निज्जर : खलिस्तानी टायगर फोर्स-KTF या दहशतवादी संघटनेचा हरदीप सिंग निज्जर प्रमुख होता. तो मुळचा जालंधरजवळील भारसिंघपूर या गावचा रहिवाशी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दोन वर्षांपूर्वी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेतही तो सक्रिय होता.
  4. गुरुजींद्र सिंग पन्नू : हा पण मुळचा पंजाबमधील दहशतवादी आहे. तो सध्या कॅनडातील Hamilton मध्ये राहतो. दहशतवादी कारवायासाठी हा पण फंड जमा करतो. त्याने आठ वर्षांपूर्वी शस्त्र खरेदी केले होते. भारतात घातपात घडविण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार होता.
  5. मलकीत सिंग उर्फ फौजी : हा मुळचा अमृतसर जवळील तलवंडी नाहर गावचा रहिवाशी आहे. तो सध्या कॅनडात Surrey या ठिकाणी राहतो. टार्गेट किलिंगसाठी तरुणांची भरती करण्यात त्याचा हातखंड आहे. 2014 मध्ये एका सुपारी देऊन हत्या प्रकरणात त्याचा हात उघड झाला होता. हा निधी पण जमा करतो.

दहशतवाद्यांची यादी सोपवली

आता निज्जरच्या नावाने गळा काढणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधान ट्रूडो यांना एका यादीचा विसर पडला आहे. 2018 मध्ये ट्रूडो हे भारत दौऱ्यावर आले होते. अमृतसर येथे पंजाब सरकारने त्यांना देशविघातक कार्य करणाऱ्या दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. त्यात हरदीप सिंग निज्जर याच्यासह गुरजीत सिंग चिम्मा, गुरप्रीत सिंग, गुरजिंदर सिंग पन्नू, मलकीत सिंग उर्फ फौजी, परविकर सिंग दुलाई, भगत सिंग ब्रार, तेहल सिंग, सुलिंदर सिंग, हरदीप सोहोटा या दहशतवाद्यांचा पण यादीत समावेश असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.