कॅन्सरचे औषध बनवणाऱ्या कंपनीला मोठा झटका, भरावा लागणार करोडोचा दंड

कॅन्सरचे औषध बनवणाऱ्या कंपनीला मोठा झटका, भरावा लागणार करोडोचा दंड (cancer medicine maker company will have to pay crore rupees penalty)

कॅन्सरचे औषध बनवणाऱ्या कंपनीला मोठा झटका, भरावा लागणार करोडोचा दंड
सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:34 PM

नवी दिल्ली : एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅन्सरचे औषध बनवणाऱ्या भारतीय कंपनीला मोठा झटका बसला आहे. उल्लंघनप्रकरणी कॅन्सरची औषधे बनवणारी कंपनी फ्रेजेनियस काबी अन्कोलॉजी लिमिटेड (एफकेओएल) कंपनीला 50 मिलियन डॉलर (368 कोटी रुपये ) दंड भरावा लागणार आहे. कंपनीच्या पश्चिम बंगालमधील प्लांटचे निरीक्षण करण्यास आलेल्या अमेरिकेच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांपासून कंपनीने काही रेकॉर्ड लपवले तर काही नष्ट केले. कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. (cancer medicine maker company will have to pay crore rupees penalty)

लास वेगास येथील फेडरल कोर्टात कंपनीने एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. एफडीएच्या अधिकाऱ्यांना काही रेकॉर्ड देण्यास आपण असमर्थ ठरलो असून फेडरल फूड, ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्टचे आपण उल्लंघन केल्याची कबुली दिली. तसेच आपल्या या गुन्ह्याबाबत 30 मिलियन डॉलरचा फौजदारी दंड आणि 20 मिलियन डॉलरचा दंड भरण्यास तयारी दर्शवली.

रुग्णांच्या जीवाशी खेळ

कंपनीने रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. तसेच औषध निर्मितीबाबतचे रेकॉर्ड लपवून आणि नष्ट करुन कंपनीने एफडीएच्या अधिकाऱ्यांना औषधांची शुद्धता आणि क्षमता सुनिश्चित करण्यापासून प्रतिबंधित केले, असे असिस्टंट अटॉर्नी जनरल ब्रायन बॉयटन यांनी सांगितले.

असे केले नियमांचे उल्लंघन

कोर्टाच्या माहितीनुसार 2013 मध्ये एफडीएच्या पाहणीआधी कंपनीच्या मॅनेजमेंटने पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील प्लांटमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीच्या कर्मचाऱ्यांना कॉम्प्यटरमधील काही रिकॉर्ड नष्ट करण्यास सांगितले होते. यावरुन हे सिद्ध होते की, कंपनीने युएस एफडीच्या नियमांचे उल्लंघन करुन प्रतिबंधित औषध सामग्री बनवत होती. मॅनेजमेंटच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कॉम्प्युटर, हार्डकॉपी दस्ताऐवज आणि अन्य माहिती हटवली.

एफडीएने 2017 मध्ये दिली चेतावणी

याप्रकरणी एफडीएने कंपनीला 4 डिसेंबर 2017 मध्ये चेतावणी दिली होती. एफकेओएलच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार सदर कंपनीची सुरुवात डाबर फार्मा कंपनीचा एक भाग म्हणून झाली होती. मात्र 2008 मध्ये डाबर फार्मा समूहाचे प्रमोटर्स बर्मन परिवाराने डाबर फार्मा कंपनीची मालकी जर्मन मल्टिनॅशनल कंपनी फ्रजेनियस एसई अँड कंपनीचे बिझनेस सेगमेंट फ्रेसेनियस काबी यांना दिली. (cancer medicine maker company will have to pay crore rupees penalty)

इतर बातम्या

‘जिवंत आहे तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी नाही’, ममता बॅनर्जींचं आव्हान

राज्यसभेत पवारांचा दाखला, मोदी म्हणाले ना खेळणार, ना खेळू देणार, मी तर खेळ बिघडवणार!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.