6 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं, त्यांना वाटलंही नव्हतं असा अंत होईल; कार झाडाला आदळली, आग लागली अन्…
कारचे टायर फुटल्याने ती अनियंत्रित होऊन झाडावर आदळली आणि कारला आग लागली. या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील तिमरणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौसर गावाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात (accident) झाला. भरधाव वेगात आलेल्या कारचे नियंत्रण सुटून झाडाला धडकली. झाडाला धडकताच कारने (car caught fire) पेट घेतला, त्यामुळे कारमधील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. गाडीत बसलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. मृतांमध्ये पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
लग्नसमारंभाहून परत येत होते
मिळालेल्या माहितीनुसार, बरकला येथे राहणारे अखिलेश कुशवाह, राकेश, राकेश यांची पत्नी शिवानी आणि आदर्श, हे सर्वजण नसरूल्लागंज येथील जीपगाव येथे एका लग्नासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पोखरणी गावाजवळ टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर जाऊन आदळली. ज्यामुळे गाडीने पेट घेतला. कारला लागलेली आग इतकी भीषण होती की गाडीतील प्रवाशांना खाली उतरण्याचाही अवधी मिळाला नाही आणि सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.
मध्य प्रदेश: हरदा के टिमरनी थाना क्षेत्र में में कार के पेड़ से टकराने के बाद आग लगने से 4 लोगों की मौत हो गई।
थाना प्रभारी सुशील पटेल ने बताया, “आज सुबह 7 बजे सूचना प्राप्त हुई कि एक दुर्घटना के बाद कार में आग लगने से 4 लोगों की जलकर मृत्यु हो गई। पुलिस मौके पर पहुंची। फायर… pic.twitter.com/AQNlJ4yXv7
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2023
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होतं लग्न
सर्व मृत व्यक्ती या हरदा जिल्ह्यातील बरकला चारखेडा येथील रहिवासी होते. मृत राकेश आणि शिवानी यांचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते, अशी माहिती मिळत आहे. लग्नाच्या सहा महिन्यांतच दोघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघाताची माहिती कुटुंबियांना दिली आहे. गाडीचा वेग खूप जास्त होता, त्यामुळे चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि कार झाडावर आदळून आग लागली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.