Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारत सरकारनं रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय (bann on export of remdesivir injection)

Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय
REMDESIVIR
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 6:06 PM

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे आता देशातील रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा (remdesivir injection) पुवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (central government banned on export of injection remdesivir injection)

केंद्र सरकारचे कंपन्यांना निर्देश

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे  केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

इंजेक्शनची सर्व माहिती वेबसाईटवर द्या

तसेच रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्यांना केंद्र सरकारने इंजेक्शनविषयीची सर्व माहिती त्यांच्या वेबासाईटवर अपडेट करण्याचेसु्द्धा निर्देश दिले आहेत. सर्व रेमेडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर इंजेक्शनची उपलब्धता, त्याचा पुरवठा तसेच वितरक यांची सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करुन द्यावी असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच, ड्रग्ज इन्स्पेकटर्स आणि संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचेसुद्दा केंद्र सरकारने निर्देशित केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. पंजाब, मध्ये प्रदेश, महाराष्ट्र तसेच गुजरात अशा राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे या राज्यांना औषधांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. तशी मागणी संबंधित राज्यांनी केंद्र सरकारकडे वेळोवेळी केलेली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने रेमेडेसिव्हीरच्या निर्यातीसंदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोनाशी दोन हात करणे सोपे होणार असल्याची बावना आहे.

इतर बातम्या :

राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत

LIVE | अनिल देशमुखांच्या 2 सचिवांची 5 तासांपासून चौकशी सुरुच

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : राज्यात आठ दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता, टास्क फोर्स लॉकडाऊनच्या बाजूने

(central government banned on export of injection remdesivir injection)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.