सर्वात मोठी बातमी : केंद्र सरकारची वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवर मोठी कारवाई
Pooja Khedkar Dismissed : वादग्रस्त अधिकार पूजा खेडकर प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने निर्णय घेत पूजा खेडकरला मोठा धक्का दिला आहे. पूजा खेडकरला सरकारी सेवेमधून बरखास्त करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरवर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणाची कोर्टात केसही सुरू आहे. पूजा खेडकरने शुक्रवारी एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पूजाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल होता.
पूजा खेडकर हिचे नाव, तिच्या पालकांचे नाव, सही, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून आपली ओळख खोटी करून परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पूजा खेडकर तिच्या अधिकारांचा गैरवापर करून CSE (नागरी सेवा परीक्षा) 2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनी दोन ओळखपत्रांवर दोन वेगवेगळे पत्ते दिले आहे. त्यांना आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिला आहे तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिला होता.
पूजा खेडकर 2020-21 मध्ये OBC कोट्यातील परीक्षेत ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने बसली होती. 2021-22 मध्ये सर्व प्रयत्न पूर्ण केल्यानंतर, पूजा OBC आणि PWBD (अपंग व्यक्ती) कोट्याअंतर्गत परीक्षेला बसली. तेव्हा ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ हे नाव वापरले होते. यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी खटला सुरू केला. यानंतर पूजा खेडकरने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टासमोर दिलेल्या उत्तरात पूजाने दावा केला की तिने युपीएससीला तिच्या नावाने फेरफार किंवा चुकीची माहिती दिली नाही.