नवी दिल्ली : देशात बर्ड फ्लूचा (Bird flu) म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाचा धोका वाढला आहे. भारतातील एकूण 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा (Avian Influenza Flu) संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यात केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दिल्लीत देखील पक्षांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. याचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे हे अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने ही माहिती दिली (Central Government issues alert as Bird Flu cases spread to 7 states).
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात दोन कुकुटपालन कंपन्यांच्या कोंबड्यांमध्ये आयसीएआर-एनआयएचएसएडीकडून केलेल्या चाचणीत एवियन फ्लूचा (एआई) संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यानंतर मध्यप्रदेशच्या शिवपुरी, राजगड, शाजापूर, आगर, विदिशा, उत्तर प्रदेशच्या झुलॉजिकल पार्क, कानपूर आणि राजस्थानच्या प्रतापगड आणि दौसा जिल्ह्यातील स्थलांतरीत पक्षांमध्येही एवियन फ्लूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय.
एकूण 7 राज्यांमध्ये संसर्ग
केंद्र सरकारने या राज्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा एकूण 7 राज्यांमध्ये संसर्ग झालाय. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात 8 जानेवारी 2021 च्या रात्री आणि 9 जानेवारी 2021 च्या सकाळी अनेक कोंबड्या आणि जंगली पक्षांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारने आपातकालीन स्थितीत आरआरटी पथकाची नियुक्ती केली आणि याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले.
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिल्ह्यात पक्षांचे संशयास्पद मृत्यू
याशिवाय दिल्लीतील संजय तलावाजवळ बदकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यांचे देखील नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिल्ह्यात मृत्यू झालेल्या पक्षांचे नमुने एनआयएचएसएडीला पाठवण्यात आलेत. दरम्यान, केरळमध्ये दोन प्रभावित जिल्ह्यांमध्ये संसर्गित पक्षांना मारण्याचं अभियान पूर्ण झालं आहे. केरल राज्य सरकारने राज्यात पोस्ट ऑपरेशनल सर्विलांस प्रोग्रामच्या सूचना जारी केल्या आहेत. केरळमध्ये या संसर्गाची तपासणी करायला केंद्राचं पथकही दाखल झालंय.
हेही वाचा :
Bird Flu | पोल्ट्री फार्म मालक आणि दुकानदारांच्या तोंडचं पाणी पळालं!
ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली
परभणीत एकाच वेळी 900 कोंबड्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूच्या भीतीचं सावट, तपास सुरु
Central Government issues alert as Bird Flu cases spread to 7 states