NEET PG Exam 2021 Postponed | पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलली, लवकरच नवी तारीख जाहीर होणार

वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG 2021) पुढे ढकलण्यात आली आहे.

NEET PG Exam 2021 Postponed | पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलली, लवकरच नवी तारीख जाहीर होणार
नीट परीक्षा
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 7:44 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे देशात रोज हजारोच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. अनेकांचा मृत्यू होतोय. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा घातक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नसल्याचे अनेकांचा मत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG 2021) पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. (Central Government postpone NEET PG 2021 exam due to surges in Corona patients across the country Health Minister Harsh Vardhan announced)

एप्रिल महिन्यातील परीक्षा पुढे ढकलली

देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच कारणामुळे देशभरात विविध राज्यांतर्गत तसेच राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बऱ्याच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएससी बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षेसंदर्भात एवढे सारे निर्णय होत असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडूनसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करुन केंद्राने द्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG 2021)  पुढे ढकलली आहे. नियोजित वेळेप्रमाणे ही परीक्षा  येत्या 18 एप्रिलला होणार होती.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय  आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं. तसेच, सध्याच्या महामारीचा अभ्यास करुनच परीक्षेची आगामी तारीख ठरवली जाईल, असेसुद्धा त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला NEET PG 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केल्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : मोठी बातमी ! राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, गर्दी कमी होत नसल्याने सरकारचा निर्णय

LIVE | पवार साहेबांनी शेवटी भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली, आता त्यांना निवडून द्या- अजित पवार

Maharashtra Sanchar Bandi : आता सर्वसामान्यांचं पेट्रोल बंद करण्याची तयारी, निर्बंध वाढवण्याच्या हालचाली

(Central Government postpone NEET PG 2021 exam due to surges in Corona patients across the country Health Minister Harsh Vardhan announced)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.