केंद्राकडून 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक, पाकिस्तानातील 4 चॅनेलचाही समावेश; नेमकं कारण काय?
केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्सवर टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या लोकांची तसंच प्रेक्षकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यूट्यूब चॅनेलसोबतच टीन ट्विटर अकाऊंट, फेसबूक अकाऊंट आणि न्यूज वेबसाईट्सही ब्लॉक करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : आयटी कायदा, 2021 नुसार देशात पहिल्यांदाच 18 यूट्यूब चॅनल (You tube Channels) ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानातीलही (Pakistan) 4 यूट्यूब चॅनेलही ब्लॉक केले गेले आहेत. असे सर्व मिळून केंद्र सरकारने एकूण 22 यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई केलीय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे यूट्यूब चॅनेल्स भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. केंद्र सरकारकडून (Central Government) कारवाई करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्सवर टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या लोकांची तसंच प्रेक्षकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यूट्यूब चॅनेलसोबतच तीन ट्विटर अकाऊंट, फेसबूक अकाऊंट आणि न्यूज वेबसाईट्सही ब्लॉक करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक केलेल्या यूट्यूब चॅनेलवरील दर्शकांची संख्या 260 कोटींपेक्षा अधिक
भारत विरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी किंबहुना भारताची बदनामी करण्यासाठी वापरले जाणारे हे चॅनेल्स बंद करण्यासाठी आयटी नियम, 2021 चा वापर करण्यात आल्याची माहिती माहिती आणि प्रसारण विभागाने दिलीय. महत्वाची बाब म्हणजे ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलवरील दर्शकांची संख्या 260 कोटींपेक्षा अधिक होती. भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांसारख्या संवेदनशील विषयांवर हे चॅनेल्स सोशल माडियीवर खोट्या बातम्या पसरवत होते. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित खोट्या बातम्याही पसरवल्या जात असल्याचा आरोप या यूट्यूब चॅनेल्सवर आहे.
केंद्र सरकारची यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई
I&B Ministry blocks 22 YouTube channels including 4 Pakistan-based YouTube news channels for spreading disinformation related to India’s national security, foreign relations, and public order.
3 Twitter accounts, 1 Facebook account & 1 news website also blocked pic.twitter.com/JtPC13MNHj
— ANI (@ANI) April 5, 2022
भारत आणि परदेशातील बिघडवण्याचा त्यांचा हेतू
अनेक यूट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून भारतीय सैन्य, जम्मू-काश्मिरमधील विषयांवर चुकीच्या बातम्या पोस्ट करण्यात येत होत्या. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतविरोधी मजकूर पोस्ट केला जात होता. त्यासाठी पाकिस्तातील काही वाहिन्यांची मदत घेतली जात होती, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आलीय. तसंच युक्रेनमधील सध्यस्थितीवर या भारतीय यूट्यूब चॅनेल्सद्वारे मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असल्याचंही समोर आलं. अनेक देशांसोबत असलेले भारताचे संबंध बिघडवण्याचा त्यांचा हेतू होता. या वाहिन्यांवरुन भारतविरोधी बातम्याही प्रसारित केल्या जात होत्या, असंही संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं.
इतर बातम्या :