गृहमंत्रालय तीन IPS अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार?, केंद्र-ममता सरकारमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्रालय (Home Ministry) पश्चिम बंगालमधील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. (ips officers west bengal)

गृहमंत्रालय तीन IPS अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार?, केंद्र-ममता सरकारमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 8:10 PM

नवी दिल्ली : तीन आयपीएस आधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीला पाठवण्यास नकार दिल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालय (Home Ministry) पश्चिम बंगाल सरकार तसेच पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. या नोटिशीद्वारे अधिकाऱ्यांना दिल्लील न पाठवल्याबद्दल जाब विचारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, या नोटिशीमुळे केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. (central home ministry will issue notice to the ips officers of west bengal)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) 10 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केला. याच कारणामुळे भाजपने पश्चिम बंगालमधील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे बोलवून घेतले. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अधिकाऱ्यांना दिल्लीला पाठवण्यास नकार देत, केंद्राचे आदेश धुडकावून लावले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय पश्चिम बंगालच्या सरकारला नोटीस पाठवून अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर न पाठवण्याचे कारण विचारण्याच्या तयारीत आहे.

प्रतिनियुक्तीवर न पाठवण्याचा जाब विचारणार

जे. पी. नड्डा हे 9 आणि10 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी पोलीस अधीक्षक भोलानाथ पांडे, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण त्रिपाठी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव मिश्रा यांना या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर नड्डा यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच, पश्चिम बंगाल सरकारला पोलीस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर न पाठवण्याचे कारण विचारले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालय नड्डा यांच्या हल्ल्यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारकडून विस्तृत स्पष्टीकरणही मागवू शकतं. (central home ministry will issue notice to the ips officers of west bengal)

दरम्यान, केंद्र सरकारने नोटीस पाठवल्यास आयपीएस अधिकारी काय उत्तर देणार?. तसेच, राज्य सरकारला जाब विचारला तर ममता बॅनर्जी काय पवित्रा घेणार?, या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

शेतकरी आंदोलनाचा 15वा दिवस, प्रस्ताव फेटाळ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार

आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण

(central home ministry will issue notice to the ips officers of west bengal)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.