वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांची प्रचंड पसंती, इतक्या कोटींची केली कमाई
वंदेभारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे. त्यामुळे तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सध्या मध्य रेल्वेवर चार वंदेभारत एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत.
मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवर सध्या चार सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत. या वंदेभारत एक्सप्रेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या वंदेभारत एक्सप्रेस आकर्षक आणि आलिशान असून त्यांचा वेग जास्त असल्याने प्रवाशांच्या वेळेतही बचत होत आहे. तसेच धार्मिक तसेच अन्य पर्यटनाच्या मार्गांवर त्या सुरु केल्याने प्रवाशांना त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सोलापूर आणि साईनगर शिर्डी अशा दोन धार्मिक स्थळांसाठी 10 फेब्रुवारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. तर पाहूयात वंदेभारतने किती कमाई केली आहे.
मध्य रेल्वेवर चार वंदेभारत धावत असून त्यांनी 15 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2023 या साधारण एक महिन्यांत एकूण 150 फेऱ्यांमध्ये 1.22 लाख प्रवाशांच्या सहाय्याने एकूण 10.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, नागपूर ते बिलासपूर आणि सीएसएमटी ते गोवा मडगाव अशा एकूण चार वंदेभारत एक्सप्रेस सध्या धावत आहेत.
1 ) ट्रेन क्र . 20825 बिलासपूर- नागपूर वंदे भारत
प्रवासी भारमान – 122.56 %
फेऱ्या- 22
प्रवासी – 14,291
उत्पन्न- रु. 1,06,04,502/-
2. ट्रेन क्र. 20826 नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी भारमान – 106.40 %
फेऱ्या- 22
प्रवासी – 12,407
उत्पन्न – रु. 99,42,868 /-
3. ट्रेन क्र. 22223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी भारमान – 81.33 %
फेऱ्या – 21
प्रवासी – 19,267
उत्पन्न – रु. 1,66,55,326 /-
4. ट्रेन क्र. 22224 शिर्डी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी भार- 81.88%
फेऱ्या- 21
प्रवासी- 19,398
उत्पन्न – रु. 1,82,81,051/-
5. ट्रेन क्र. 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी भारमान – 93.71 %
फेऱ्या- 21
प्रवासी – 22,200
उत्पन्न – रु. 1,71,92,102/-
6. ट्रेन क्र 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी भारमान – 105.09 %
फेऱ्या- 21
प्रवासी- 24,894
उत्पन्न – रु. 1,97,28,491 /-
7. ट्रेन क्र. 22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोवा मडगाव वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी भारमान – 92.05 %
फेऱ्या – 11
प्रवासी – 5,367
उत्पन्न – रु. 76,11,662 /-
8. ट्रेन क्र. 22230 गोवा मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
प्रवासी प्रवासी भारमान – 75.50 %
फेऱ्या – 11
प्रवासी- 4,402
उत्पन्न – रु. 72,04,716 /-
( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव ( गोवा ) एक्स्प्रेस आता मान्सून वेळापत्रकानूसार आठवड्यातून तीन वेळा धावते )