मध्य रेल्वेचा प्रवास वेगवान होणार, मनमाड ते नांदगाव 25 किमीचा तिसरा रेल्वे मार्ग तयार

मनमाड-नांदगाव सेक्शनची 25.09 किमीची नवीन तिसरी लाईन सुरू झाली असून रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी (CRS) 130 किमी वेगात रेल्वे चालवून चाचणी घेतली आहे.

मध्य रेल्वेचा प्रवास वेगवान होणार, मनमाड ते नांदगाव 25 किमीचा तिसरा रेल्वे मार्ग तयार
130 kmph speed trial Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 8:55 PM

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मध्य रेल्वेने मनमाड ते नांदगाव सेक्शन दरम्यानची 25.09 किमीची नवीन तिसरी मार्गिका विद्युतीकरणासह सुरु केली आहे. भुसावळ ते मनमाड या 183.94 किमीच्या महत्वाकांक्षी तिसऱ्या रेल्वे मार्गापैकी मनमाड ते नांदगाव हा 25.09 किमीचा मार्ग तयार झाल्याने प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई-हावडा या व्यस्त मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी या नवीन 3 ऱ्या लाइनची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे. यामुळे ट्रेनच्या संख्येत वाढ होणार आहे. तसेच संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ट्रेनचा वेग देखील वाढणार आहे.

मध्य रेल्वेच्या वर्दळीच्या भुसावळ- मनमाड दरम्यान 183.94 किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यापैकी मनमाड-नांदगाव सेक्शनची 25.09 किमीची नवीन तिसरी लाईन विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू झाली आहे. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी (CRS) यांच्या देखरेखीखाली सुरक्षा तपासणी करण्यात येऊन आणि 130 किमी वेगात रेल्वे चालवून चाचणी घेण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा मनोज अरोरा, भुसावळ विभाग विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, मुख्य अभियंता एस.के.झा, उपमुख्य अभियंता किशोर सिंह अन्य वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.

1360.16 कोटी रुपयांचे बजेट

1360.16 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या भुसावळ-मनमाड 3र्‍या मार्गापैकी मनमाड-नांदगाव सेक्शनची 25.09 किमीची नवीन तिसरी लाईन तयार झाली आहे. प्रस्तावित विद्युतीकरणापैकी भुसावळ ते मनमाड या एकूण 183.94 किमी रेल्वे मार्गापैकी 96.81 किमी मार्ग पूर्ण झाला आहे, एकूण उद्दिष्टाच्या दिशेने 52% काम झाले आहे. भुसावळ-पाचोरा विभागाचा 71.72 किमी लांबीचा भाग यापूर्वीच यशस्वीरित्या बांधून सुरु करण्यात आला आहे.

47 पुलांची गरज आहे

भुसावळ ते मनमाड 183.94 किमी लांबीच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी एकूण 47 पुलांची गरज आहे, ज्यामध्ये 6 मोठे आणि 41 लहान पूल आहेत. पांझन स्थानकाजवळील 700 मीटरच्या अंतरावर रॉक-कटींगचे कठीण काम झाले आहे. या विभागात मनमाड जंक्शन, पानेवाडी, हिसवाहळ, पांझण आणि नांदगाव अशी स्थानके आहेत.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.