60 मुलींचा अंघोळ करताना एमएमएस व्हायरल, यापैकी 8 मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, 1 गंभीर…

चंदीगड विद्यापीठातील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने दुसऱ्या 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ करुन व्हायरल केले आहे. त्यातील 8 विद्यार्थिनीनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

60 मुलींचा अंघोळ करताना एमएमएस व्हायरल, यापैकी 8 मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, 1 गंभीर...
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 12:04 PM

चंदीगडः चंदीगड विद्यापीठात (Chandigarh University) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या विद्यापीठातील 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ करुन इंटरनेटवरुन व्हायरल (MMS Viral) केला गेला आहे. या घटनेमुळे विद्यापीठात प्रचंड गोंधळ उडाला आहे. पंजाबमधील मोहाली परिसरात असणाऱ्या विद्यापीठात रात्री उशिरा प्रचंड गोंधळ उडाला होता. वसतिगृहातीलच एका विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचे व्हिडीओ करुन ते इंटरनेटवरुन व्हायरल केले गेले आहेत. वसतिगृहातील विद्यार्थिनीना ही गोष्ट समजल्यानंतर मात्र त्यातील 8 विद्यार्थिनीनी आत्महत्येचा प्रयत्न ( 8 student attempted suicide) केला आहे.

ही घटना समोर येताच विद्यापीठातील गेट नंबर 2 वर आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातील एक विद्यार्थिनी गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद केला असून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक केली आहे.

चंदीगड विद्यापीठातील ही घटना उघडकीस आल्यानंतर मध्यरात्रीनंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. वसतिगृहातील 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाच व्हिडीओ व्हायरल केले गेले आहेत.

वसतिगृहातील एक विद्यार्थिनी इतर विद्यार्थिनी अंघोळ करताना त्याचे शुटींग करुन ती आपल्या एका मित्राला पाठवत होती आणि तो तिचा मित्र ते व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करत होता असा आरोप केला गेला आहे.

विद्यार्थिनींचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने जोरदार आंदोलन करत आम्हाला न्याय पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या.

हे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे समजल्यानंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यातील एक विद्यार्थिनी गंभीर असून इतर मुलींना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

ही घटना समोर आल्यानंतर विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर ज्या विद्यार्थिनीने हा प्रकार केला आहे, तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकारानंतर मध्यरात्रीच विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन पुकारण्यात आले. विद्यापीठाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. त्यावेळी विद्यापीठ प्रशासनाविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.