Chandipur Election Result 2021 LIVE : चांदीपूर विधानसभेत भाजप आणि तृणमूलमध्ये कांटे की टक्कर

Assembly Election Result 2021 Live Update in Marathi: चांदीपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील चुरशीच्या लढतीचे लाईव्ह अपडेट

Chandipur Election Result 2021 LIVE : चांदीपूर विधानसभेत भाजप आणि तृणमूलमध्ये कांटे की टक्कर
Chandipur Election Result 2021 LIVE
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 6:27 AM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभेच्या 294 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या जागांवर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे चांदीपूर विधानसभा (Chandipur Election Result 2021 LIVE).

या मतदारसंघातून एकूण 7 उमेदवार उभे आहे. या मतदार संघात तृणमूल काँग्रेसने सोहम चक्रवर्ती (Soham Chakraborty) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने पुलक कांती गुरिया (Pulak Kanti Guria) यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनेदेखील या मतदार संघात आपला उमेदवार दिला आहे. माकपकडून आशीष कुमार गुछैत (Ashis Kumar Guchhait) यांना निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. या तिघांसह आणखी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु या मतदार संघात खरी टक्कर ही भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

चांदीपूर मतदारसंघाची 2016 ची लढत

गेल्या 10 वर्षांपासून या मतदार संघात सत्ताधारी टीएमसी पक्षाची सत्ता आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीचे अमियकांती भट्टाचार्य येथून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) मंगल चॅटर्जी यांना 9 हजार 654 मतांच्या फरकाने पराभूत केलं होतं. अमियकांती भट्टाचार्य यांना येथे एकूण 95 हजार 982 मते मिळाली होती, तर मंगल चॅटर्जी यांना 86 हजार 328 मतं मिळाली होती. तर या मतदार संघात भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. भाजपच्या उमेदवाराला या मतदार संघात 10 हजारांच्या आसपास मतं मिळाली होती.

विधानसभा क्षेत्रातील मतदारांची संख्या

2016 च्या निवडणुकीवेळी या मतदार संघातील मतदारांची संख्या एकूण 2 लाख 23 हजार 472 इतकी होती. त्यापैकी एकूण 1 लाख 98 हजार 738 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण 252 बूथ तयार करण्यात आली होते. या मतदार संघात 89 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.

2011 मध्ये पहिल्यांदाच चांदीपूर विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली होती. पहिल्याच निवडणुकीत टीएमसीने बाजी मारली होती. अमियकांती येथून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले. चंदीपूर विधानसभा मतदारसंघ त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघात येतो.

गेल्या निवडणुकीचे आकडे

  • सध्याचे आमदार : अमियकांती भट्टाचार्जी
  • एकूण मिळालेली मतं : 95 हजार 982
  • मतदारसंघातील एकूण मतदार : 2 लाख 23 हजार 472
  • वोटर टर्नआउट : 88.93 टक्के
  • एकूण उमेदवार : 7

(Chandipur election result 2021 live counting and updates West Bengal Chandipur Assembly MLA seat Amiya Kanti Bhattacharya candidate Party Winner Naame latest news in Marathi)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.