पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे झाला खुलासा

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता आली तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसवण्यास मदत मिळेल.

पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे झाला खुलासा
chandrayaan-1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 9:23 PM

नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2023 : भारताच्या चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करुन इतिहास घडविला आहे. परंतू इस्रोच्या चंद्रयान-1 ने साल 2008 मध्ये चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला होता. परंतू आता चंद्रयान-1 च्या डाटाचा अभ्यास करुन संशोधकांनी दावा केला आहे की पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत आहे. पृथ्वीवरुन जाणारे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स चंद्रावर पाणी तयार करण्यासाठी मदत करीत आहेत. हे संशोधन अमेरिकेतील मनोवा येथील हवाई युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे.

पृथ्वीवरील इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास हातभार लावत आहेत. अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासात असे आढळले की पृथ्वीवरील उपस्थित प्लाझा शिटमुळे चंद्रावरील दगड वितळतात किंवा त्यांची झिज होते. आणि खनिजांची निर्मिती होत असते. किंवा ते बाहेर येतात. तसेच चंद्राचा पृष्ठभाग आणि वातावरण बदलत असते. हा अभ्यास अलिकडेच नेचर एस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की इलेक्ट्रॉन्समुळेच चंद्रावर पाणी तयार होते. चंद्रावर पाण्याचे किती प्रमाण आहे हे अजूनही कळलेले नाही. आणि त्याचा शोध घेणेही कठीण आहे. त्यामुळे चंद्रावरील पाण्याच्या उत्पत्तीच्या कारणांचा शोध लागलेला नाही.

तरच चंद्रावर मनुष्यवस्ती शक्य

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता आली तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसवण्यास मदत मिळेल. चंद्रयान-1च्या एका यंत्राने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण शोधले होते. हे भारताचे पहिले मिशन होते. चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर हवेच्या क्षेत्रात येतात. सौर हवेतील एनर्जी कण उदा. प्रोटोन आणि इलेक्टॉन वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर मारा करतात. त्यामुळे चंद्रावर पाणी तयार होत आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. सौर हवा जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जाते तेव्हा ती चंद्राला वाचविते. परंतू पृथ्वी सुर्यापासून निघणाऱ्या हलक्या कणांपासून चंद्राला ती वाचवू शकत नाही.

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम

चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून बाहेर असतो तेव्हा सुर्याच्या गरम हवेचा मारा त्याच्यावर जादा होतो. आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या आत असतो तेव्हा सुर्याच्या हवेचा काहीही मारा होत नाही. अशा वेळी पाणी तयार होण्याची प्रक्रिया बंद होते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे चंद्रावर पाणी बनण्याच्या प्रक्रियेत वेग किंवा शैथिल्य येते. याचा अर्थ पाणी तयार करण्यास चुंबकीय क्षेत्र थेट जबाबदार नाही. परंतू त्याचा प्रभाव मात्र आहे. सौर हवेतील हाय एनर्जी प्रोटोन्स-इलेक्ट्रॉन्सचा परिणाम होतो. सहायक संशोधक शुआई ली आणि त्यांचे साथीदार चंद्रयान-1 च्या मून मिनरोलॉजी मॅपर इंस्ट्रूमेंटने पाठविलेल्या डेटाचे वर्गीकरण केले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.