Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

भारताच्या 'चंद्रयान-2' चा लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहेत. आज मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी हा ऐतिहासिक क्षण भारतीयांना अनुभवता येणार आहे.

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री 'चंद्रयान 2'चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत 'विक्रम' रचणार
Follow us
| Updated on: Sep 07, 2019 | 7:28 AM

Mission Chandrayaan-2 श्रीहरीकोटा :  7 सप्टेंबर 2019 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदवला जाणार आहे. भारताच्या ‘चंद्रयान-2’ (Chandrayan 2) चा लँडर ‘विक्रम’ (Lander Vikram) आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ (Rover Pragyaan) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Soft Landing on Lunar Surface) करणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ (Indian Space Research Organisation, ISRO) सह तमाम देशवासी या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘चंद्रयान 2’ आज मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरताच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, यूएस आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. मात्र आजवर कधीही समोर न आलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचं मिशन आखणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे इथे लँडिंग करुन विक्रम हा ‘विक्रम’ आपल्या नावे करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशभरातून निवडलेल्या 60 ते 70 विद्यार्थ्यांसोबत ‘इस्रो’मधून हा क्षण अनुभवणार आहेत. यामध्ये बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थिनीचाही समावेश आहे.

‘इस्रो’चं महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-2’ 22 जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं. चंद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रावरील स्वारी आहे. भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.

20 ऑगस्टला ‘चंद्रयान-2’ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. लँडर ‘विक्रम’ 2 सप्टेंबरला ऑर्बिटरपासून विलग झाला. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत राहणार असून लँडर ‘विक्रम’ हा पृष्ठभागावर उतरेल. तर रोव्हर ‘प्रज्ञान’ मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर फिरत संशोधन करेल.

‘चंद्रयान-2’ सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास करुन चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवसांचा कालावधी लागला. 978 कोटी रुपये खर्च करुन केलेलं हे मानवविरहित मिशन आहे.

चंद्रयान 2 सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून 35 किमी अंतरावर आहे. या ठिकाणाहून जेव्हा ‘चंद्रयान 2’ चंद्राच्या दिशेने आपल्या प्रवासाला सुरुवात करेल, ती 15 मिनिटं अत्यंत थरारक असतील. कारण ‘इस्रो’साठी हा पहिलाच अनुभव आहे.

चंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये

  • चंद्रयान-2 पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहुबली रॉकेटने यशस्वी उड्डाण
  • मिशन चंद्रयान 2 मोहीम दोन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्त्वात यशस्वी
  •  चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत एकमेव देश ठरणार
  • दक्षिण ध्रुवावरील रहस्य उलगडणार, चंद्रवरील पाणी, खनिजांचा शोध

संबंधित बातम्या

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान!

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?    

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.