Chandrayaan – 3 update | चंद्रयान-3 ने पाठविली चंद्राची पहीली छायाचित्रे, काल चंद्राच्या कक्षेत आगमन करताना टिपली चंद्रभूमीची सुंदर छबी

चंद्रयानाला चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर आज रविवारी रात्री अकरा वाजता त्याचे कक्षा कमी करण्याचे प्रचालन केले जाणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे.

Chandrayaan - 3 update | चंद्रयान-3 ने पाठविली चंद्राची पहीली छायाचित्रे, काल चंद्राच्या कक्षेत आगमन करताना टिपली चंद्रभूमीची सुंदर छबी
moon Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:44 PM

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 ने काल महत्वाच्या कामगिरी करीत चंद्राच्या कक्षेत पदार्पण केले आहे. या चंद्राच्या कक्षेत शिरल्यानंतर आता चंद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागाची मनमोहक छायाचित्रे काढली असून इस्रोने आज रात्री ती प्रसिद्ध केली आहेत. भारताचे चंद्रयान-3 काल 5 ऑगस्ट 2023 रोजी रात्री चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेशकर्ते झाले होते. भारताने 14 जुलै रोजी चंद्रयान-3 चे आंध्रप्रदेशाती श्रीहरिकोटा येथून रॉकेटद्वारे प्रक्षेपण केले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात चंद्रयान चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.

इस्रोने ट्वीटरवर पाठविलेला व्हिडीओ येथे पाहा –

भारताच्या चंद्रयानाने 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून उड्डान केल्यानंतर आतापर्यंत पृथ्वी चंद्रादरम्यानचे दोन तृतीयांश अंतर कापले आहे. पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर काल चंद्रयानाचा चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश घडविण्यात आल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने म्हटले आहे. आता चंद्राच्या कक्षेत शिरल्यानंतर आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राचा अनुभव चंद्रयानाला होत असल्याचा संदेश इस्रोने जारी केला होता. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर चंद्रयानाने चंद्राची काही छायाचित्रे काढली आहेत. ही छायाचित्रे इस्रोने ट्वीटरवर शेअर केली आहेत.

चंद्रयानाला चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर आज रविवारी रात्री अकरा वाजता त्याचे कक्षा कमी करण्याचे प्रचालन केले जाणार आहे. त्यानंतर चंद्राच्या प्रदक्षिणा घालत चंदयान चंद्राच्या जवळजवळ जात 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यावर चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणारा अमेरिका, रशिया, चीन नंतर भारत चौथा देश ठरणार आहे.

तर भारत जगातला पहिला देश ठरेल 

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारा जगातला पहिला देश ठरणार आहे. या चंद्राच्या दक्षिण पोलवर आतापर्यंत कोणत्याच देशाने लॅंडींग करण्याचे धाडस दाखविलेले नाही. कारण हा भाग नेहमीच काळोखात असून येथील तापमान अतिशीत आहे. येथे यान विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.