Chandrayaan 3 Mission : चंद्रयान 3 च्या लँडिंगबाबत इस्रोकडून मोठं अपडेट, 23 ऑगस्टला जर प्लान फिस्कटला तर…

भारताच्या चंद्रयान 3 मिशनकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. रशियाच्या लुनाचं क्रॅश झाल्याने आता चंद्रयान 3 बाबत उत्सुकता वाढली आहे. आता इस्रोने याबाबत मोठं अपडेट दिलं आहे.

Chandrayaan 3 Mission : चंद्रयान 3 च्या लँडिंगबाबत इस्रोकडून मोठं अपडेट, 23 ऑगस्टला जर प्लान फिस्कटला तर...
Chandrayaan 3 Mission
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 9:09 PM

मुंबई : इस्रोनं चंद्रयान 2 मधून बराच बोध घेत चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. यावेळी चंद्रयान 3 चं चंद्रावर पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग होईल अशी प्रत्येक भारतीयांना आशा आहे. कारण चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत व्यवस्थितरित्या पोहोचलं असून संपर्कही जबरदस्त होत आहे. पण आता पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगची प्रतीक्षा आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोने या लँडिंगची तारीखही जाहीर केली आहे. इस्रोच्या मते चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरेल. पण आता इस्रोकडून याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती खुद्द इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारण चंद्रयान चंद्रावर उतरवण्यासठी सपाट पृष्ठभागाचा शोध घेणं खूपच कठीण झालं आहे.

लँडर मॉड्युलमध्ये लागलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही फोटो शेअर करण्यात आले आहे. इस्रो अधिकारी या कॅमेऱ्यातून टिपलेल्या फोटोच्या माध्यमातून सपाट पृष्ठभाग शोधत आहेत. पण अजून तसा भाग काही निदर्शनास आला नाही. त्यामुळे चंद्रयान 3 चंद्रावर उतरण्यासाठी काही दिवसांचा अवधी अजून लागू शकतो.

चंद्रयान 3 ची लँडिंग तारीख बदलली जाणार

गुजराजच्या अहमदाबादमधील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे व्यवस्थापक निलेश एम. देशी यांनी तारीख बदलली जाऊ शकते अशी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, चंद्रयान चंद्रावर उतरवण्याच्या दोन तास आधी लँडर आणि चंद्र यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. तिथली स्थिती योग्य असल्यास लँडर चंद्रावर उतरवण्याचा निर्णय घेतला जाईल. जर स्थिती योग्य नसेल तर मात्र चंद्रावर लँडर उतरवण्याची तारीख 27 ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते. असं असलं तरी सध्या 23 ऑगस्टलाच लँडर उतरवण्याचा मानस आहे.

चंद्रयान लँडिंग बघा लाईव्ह

चंद्रावर चंद्रयान लँडिंग लाइन ब्रॉडकास्ट केलं जाणआर आहे. इस्रोच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग बघण्याची संधी मिळेल. इतकंच नाही तर तज्ज्ञ व्यक्तींकडून माहितीही मिळेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.