Chandrayaan-3 Landing : चंद्रभूमीला स्पर्श होताच इतके तास सर्व काही होणार ‘ब्लँक’! कारण तरी काय

Chandrayaan-3 Landing : शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रयान-3 चे लँडर चंद्रावर उतरेल, त्यावेळी त्याची गती जवळपास शून्य वेगापर्यंत कमी करण्यात येईल. तरीही चंद्रावर उतरण्याच्या या प्रयत्नात चंद्रावर मोठी उलथपालथ होईल. काय होईल चंद्रभूमीवर, का होईल काही तास ब्लँक, काय आहेत यामागील कारणं.

Chandrayaan-3 Landing : चंद्रभूमीला स्पर्श होताच इतके तास सर्व काही होणार 'ब्लँक'! कारण तरी काय
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 5:56 PM

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : अवघ्या काही मिनिटात चांदोबावर चंद्रयान-3 चे लँडर (Chandrayaan-3 Lander) उतरेल. भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रो या प्रयोगातून यशाची चव चाखणार आहे. यशस्वीपणे चंद्रभूमीवर उतरल्यानंतर लँडरमधील रोव्हर (Rover) , ज्याला भटक्या म्हणू शकता. तो चंद्राच्या भूमीवर उतरेल. पण शास्त्रज्ञांच्या मते, रोव्हर जसे चंद्रावर उतरेल, त्यावेळी काही तासात सर्व काही ब्लँक होईल. आजूबाजूचे काहीच दिसणार नाही. चंद्रयान-3 चे लँडर चंद्रावर (Chandrayaan-3 Landing) उतरेल, त्यावेळी त्याची गती जवळपास शून्य वेगापर्यंत कमी करण्यात येणार आहे. चंद्रावर उतरण्याची ही कसरत चंद्रावर मोठी उलथपालथ करेल. काय होईल चंद्रभूमीवर, का होईल काही तास ब्लँक, काय आहेत यामागील कारणं?

का होईल ब्लँक

लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरताच काही तासांसाठी सर्व काही ब्लँक होईल. आजूबाजूचे काहीच दिसणार नाही. अर्थात ही काही तांत्रिक अडचण वा समस्या नसेल. तर त्यामागे चंद्रावर लँडर उतरल्यामुळे होणारी उलथापालथ त्यासाठी कारणीभूत असेल. चंद्रावर लँडर उतरल्यावर तिथे धूळ उडेल. या धुळीमुळे वातावरणात लवकर काही स्पष्ट दिसणार नाही. इस्त्रोच्या माहितीनुसार दोन तास हा घडामोड होईल. रोव्हरचे आयुष्य 14 दिवस आहे. त्यामुळे या कालावधीत सर्व प्रयोग करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

धूळ शक्तीशाली

चंद्रावरील धूळ पण शक्तीशाली असणार आहे. चंद्रयान-3 चे लँडर चंद्रावर उतरेल, त्यावेळी त्याची गती जवळपास शून्य वेगापर्यंत कमी करण्यात येईल. तरीही चंद्राच्या जमिनीवर त्याचा परिणाम तात्काळ दिसून येईल. चंद्राच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात धूळ उडेल. ही धूळ जबरदस्त असेल. ही धूळ इलेक्ट्रिकली चार्ज्ड असेल. तसेच ही धूळ जमिनीवरच बसणार नाही, तर रोव्हर आणि लँडवरपर चिपकेल. त्यामुळे इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पण या धूळीचा सामना करावा लागणार आहे.

इतके तास लागतील

शास्त्रज्ञांच्या मते, लँडिंगवेळी, उतरतांना, होणाऱ्या हाचालीतून ही धूळ उडेल. ती खाली बसण्यासाठी काही तास लागू शकतात. इस्त्रोच्या अंदाजानुसार त्यासाठी दोन तास लागू शकतात. तर काही तज्ज्ञांच्या मते, त्यापेक्षा पण अधिक काळ लागू शकतो. ही धूळ उडेल त्यावेळी सर्वकाही ब्लँक होईल. धूळ उडते, त्यावेळी चंद्रावर तिची गती अधिक असते. तीचे घनत्व पण अधिक असते. धूळ बसल्यानंतर चंद्रावर इतर प्रयोग करण्यासाठी भरपूर कालावधी मिळणार आहे.

केवळ 2 मीटर प्रति सेंकद गती

चंद्राच्या जमिनीवर उतरण्याची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. काही क्षणातच हे लँडर उतरेल. चंद्रावर उतरतानात त्याची गती केवळ 2 मीटर प्रति सेंकद असेल. याकाळात पण चंद्रयान छायाचित्र पाठवत आहे. लँडर प्रत्येक फोटो पाठवत आहे.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.