नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : भारताच्या मून मिशनला यशस्वी होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आज संध्याकाळी 5.30 ते 6.30 वाजता चंद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. या यानाची लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होणार आहे. इसरो जी लाँगिट्यूड आणि लॅटिट्यूड सांगितली आहे. ते मॅनिंजस क्रेटरचं निदर्शक आहे. त्यामुळे त्याच्या आसपासच ही लँडिंग होणार आहे. चंद्रयान -3 अंतराळात 40 हजार किलोमीटर प्रतितास वेगाने चालणार आहे.
चंद्रयान – 3 अंतराळात ताशी 40 हजार किलोमीटर वेगाने चाललं आहे. मात्र, रशियाचं मिशन मून फेल गेल्यानंतर इसरोने मोठा निर्णय घेतला आहे. आता या यानाची लँडिंग कासवाच्या गतीने सुरू ठेवण्यात येणार आहे. कासवाच्या चालीपेक्षाही कमी स्पीडने हे यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कासव सरासरी 4 ते 5 सेकंद प्रति सेकंदाने तरंगतात. तर 1 ते 2 मीटर प्रति सेकंदाच्या स्पीडने जमिनीवरून चालतात. कासवांची पिल्लं तर 30 तासात 40 किलोमीटरचं अंतर कापतात. मादी कासव तर तिची पिल्ले किंवा नर कासवांपेक्षाही अधिक स्पीडने तरंगते. आपल्या पिलांचं शिकार करणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी ते हे करत असते. त्याच प्रमाणे आता चंद्रयान -3ची लँडिंग 1 ते 2 मीटर प्रति सेकंद गतिने होणार आहे.
रशियाचं लूना-25 स्पेस क्राफ्ट सश्यासारखं धावलं. लवकरच पोहोचण्याच्या घाईत हे यान क्रॅश झालं आणि रेसमधून बाहेर पडलं. रशियाच्या स्पेस एजन्सीच्या प्रमुखांनीही ही चूक मान्य केली आहे. लुना-25 निर्धारीत वेगापेक्षा दीडपट वेगाने पुढे गेलं. फिक्स ऑर्बिटच्या तुलनेत ओव्हरशूट करण्यात आलं. त्यामुळे चंद्रावर जाऊन ते आदळलं, असं रशियाच्या स्पेस एजन्सीच्या प्रमुखाचं म्हणणं आहे. तर इसरोचं चांद्रयान -3 आपला 42 दिवसाचा प्रवास हळूहळू करत आहे. हे यान ग्रॅव्हिटिचा फायदा उचलत आहे.
विक्रम लँडर 25 किलोमीटरच्या उंचीवरून चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. पुढच्या स्टेपपर्यंत पोहोचायला त्याला सुमारे 11.5 मिनिट लागतील. म्हणजे 7.4 किलमोटर उंचीपर्यंत.
7.4 किलोमीटर उंचीवर पोहोचण्यासाठी त्याची गती 358 मीटर प्रति सेकंद असेल. पुढचा टप्पा हा 6.8 किलोमीटरचा असेल.
6.8 किलोमीटरच्या उंचीवर गती कमी करून 336 मीटर प्रति सेकंद होईल. त्याची पुढची लेव्हल 800 मीटर असेल.
800 मीटर उंचीवर लँडरच्या सेंसर्स चंद्राच्या पृष्ठभूमीवर लेझर किरणं टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधेल.
150 मीटर उंचीवर लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे 800 मीटर ते 150 मीटरच्या उंचीच्या दरम्यान.
60 मीटर उंचीवर लँडरची स्पीड 40 मीटर प्रति सेकंद असेल. 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान.
10 मीटरच्या उंचीवर लँडरची स्पीड 10 मीटर प्रति सेकंद असेल.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरची स्पीड 1.68 मीटर प्रति सेकंद असेल.