chandrayaan-3 live : चंद्रयान-3 नेमके चंद्रावर काय करणार अभ्यास ? या मोहिमेची गरज काय ?
भारताचे चंद्रयान-3 चंद्रावर स्वारी करण्यासाठी निघाले आहे. या प्रवासातील रॉकेटचे सर्व टप्पे सुरळीत पार पाडून चंद्रयान गुरुत्वाकर्षाचे कवच भेदत अंतराळात झेपावले आहे.
नवी दिल्ली : चंद्रयान-3 मोहिमे सुरु झाली आहे. चंद्रयान-३ चे LVM-3 रॉकेट प्रक्षेपकाद्वारे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी उड्डाण झाले आहे. अंतराळात झेपावल्यानंतर देशभरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अंतराळात गेल्यानंतर रॉकेटचे सर्व टप्पे सुरळीत पार पडले आहेत. भारताच्या या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागून राहीले आहे. आता 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर प्रत्यक्षात विक्रम लॅंडरचे लॅंडींग होणार आहे.
भारताचे चंद्रयान-3 चंद्रावर स्वारी करण्यासाठी निघाले आहे. या प्रवासातील रॉकेटचे सर्व टप्पे सुरळीत पार पाडून चंद्रयान गुरुत्वाकर्षाचे कवच भेदत अंतराळात झेपावले आहे. यावेळी कोणतीही कसूर राहू नये म्हणून इस्रोने लॅंडरमध्ये अनेक बदल केले आहेत. लॅंडरची सॉफ्ट लॅंडींग होण्यासाठी आणि ते क्षतिग्रस्त होऊ नये म्हणून ते अधिक मजबूत बनविले आहे.
असा होणार आहे अभ्यास
चंद्रयान-३ चंद्राच्या आपल्याला कधीच दिसलेल्या दक्षिण गोलार्धात लॅंड होणार आहे. या भागात अधिक प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे अधिक काळजी घेतली आहे. चंद्रयान-2 प्रमाणेच या चंद्रयान-3 मोहिमेत देखील लॅंडरचे नाव विक्रमच आहे. विक्रम लॅंडरमध्ये असलेल्या चंद्राज् सरफेस थर्मोफिजिकल एक्सपिरिमेंट ( ChaSTE ) द्वारे चंद्रावर थर्मल प्रॉपर्टीज आहे का याचा तपास केला जाईल. लुनार सेस्मिक एक्टीविटी ( ILSA ) याद्वारे चंद्राच्या भुपृष्ठावर भूंकपाच्या लहरी निर्माण होतात का याचा अभ्यास केला जाणार आहे.
चंद्रावरील स्थितीचा अभ्यास
एनाटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेनसिटीव्ह आयनोस्पीयर एण्ड एटोस्पियर ( RAMBHA ) या यंत्राद्वारे चंद्रावरील गॅस किंवा प्लाझा एन्व्हार्यमेंटचा अभ्यास होणार आहे. प्रज्ञान रोव्हरमध्ये अल्फा पार्टीकल एक्सरे स्पेक्टोमीटर ( APXS ) आणि लेसर इंडक्टेड ब्रेकडाऊन स्पेक्टोमीटर ( LIBS ) बसविण्यात आला आहे. पर्पप्लशन मॉड्यूल किंवा ऑर्बिटर मध्ये स्पेक्ट्रोपोलारीमेंटरी ऑफ हॅबिटेबल प्लानेट अर्थ हे यंत्र नेले असून ते पृथ्वीच्या परिभ्रमणाचा चंद्रावरुन अभ्यास करणार आहे.