Chandrayaan 3 Update | चांदोबावर आपण घर बांधू शकतो, चंद्रयान-3 दिली महत्वाची माहिती

चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असून त्याच्यावर मानवाने अनेक याने पाठवून संशोधन सुरु ठेवले आहे. चंद्रयान-3 दिलेल्या माहीतीनूसार चंद्राची जमीन आधीच्या अपेक्षापेक्षा मानवी वसाहतीस अधिक अनुकुल आहे.

Chandrayaan 3 Update | चांदोबावर आपण घर बांधू शकतो, चंद्रयान-3 दिली महत्वाची माहिती
MOON HOMEImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 9:13 PM

बंगळुरु | 4 सप्टेंबर 2023 : भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहिमेवर साऱ्या जगाचे लक्ष आहे. आता चंद्रावरील एक दिवस संपल्याने चंद्रयान-3 रोव्हर प्रज्ञान आणि विक्रम लॅंडर यांनी स्लीप मोडवर ठेवण्यात आले आहे. चंद्रावर आता रात्र सुरु झाली आहे. रात्री दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे होणार आहे. सुर्य प्रकाश नाहीसा झाल्यामुळे रोव्हरची बॅट चार्ज होऊ शकणार नाही. त्यामुळे इस्रोने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रणा जर धडधाकट राहीली तरच दुसऱ्या सु्र्योदयानंतर सर्व सिस्टीम काम करु शकणार आहे. परंतू आतापर्यंत चंद्रयान-3 दिलेल्या माहितीप्रमाणे चंद्रावर मानवी वसाहत वसवणे शक्य असल्याची आशा निर्माण झाली आहे.

चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असून त्याच्यावर मानवाने अनेक याने पाठवून संशोधन सुरु ठेवले आहे. चंद्रयान-3 दिलेल्या माहीतीनूसार चंद्राची जमीन आधीच्या अपेक्षापेक्षा मानवी वसाहतीस अधिक अनुकुल आहे. रोव्हरच्या उपकरणांनी पाठविलेल्या डाटानुसार चंद्राचा पृष्ठभाग उष्मा रोखणारा आहे. आणि मातीत ऑक्सिजन मुलद्रव्ये आढळले आहे. ‘द हिंदू बिझनेसलाईन’च्या बातमीनूसार संशोधकांना वाटते की चंद्राच्या मातीद्वारे उष्णता रोखणारे साहित्य तयार केले जाऊ शकते. ऑक्सिजनला ही मिळविता येऊ शकते. त्यामुळे येथे मानवी वसाहत वसविण्याचे मानवाचे स्वप्न साकार होऊ शकते. जेव्हा विक्रम लॅंडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला तेव्हा पासून त्याने डाटा पाठविण्यास सुरुवात केली. सर्व डाटाचे सर विश्लेषण केले तर मानवाच्या आधीच्या अपेक्षेपेक्षाही चंद्रावर रहाणे अधिक शक्यप्राय गोष्ट आहे. लॅंडरने दिलेल्या माहितीने हे शक्य झाले आहे.

चंद्राच्या मातीपासून उष्मारोधी घरे

लॅंडर विक्रममधून बाहेर पडलेल्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर 10 सेंटीमीटर खड्डा खणला त्यातील मातीचे तापमान मोजले असता असे उघड झाले की पृष्ठभागाचे तापमान 50 डीग्री सेल्सियस गरम होते. तर आठ सेंटीमीटर खाली मायनस 10 डीग्री सेल्सियस इतके कमी तापमान होते. आता संशोधकांना समजले की चंद्राच्या आतील तापमान थंड आहे. विक्रमने हे स्पष्ट केले की चंद्राच्या वरील माती उष्मारोधक आहे. संशोधकाच्या मते चंद्रावर कोणतेही वातावरण आवरण नसल्याने सुर्याचे ऊन्ह थेट येत असल्याने तापमान जास्त असते.

ऑक्सिजनचा आणखी एक पर्याय खुुला

चंद्रावर दिवसाचे तापमान 123 डिग्री सेल्सिअसपर्यंत उष्ण आणि रात्री मायनस 233 डीग्री सेल्सिअस असे टोकाचे असते. चंद्रयान-3 च्या माहितीमुळे चंद्रावर आता उष्मारोधक सामान घेऊन जायची गरज नाही. चंद्राखालील तापमान थंड असल्याचे माहीती झाल्याने  मानवाला राहण्यास तशी घरे बांधावी लागतील. प्रज्ञान रोव्हरच्या LIBS उपकरणाने चंद्राच्या मातीत लेझर बीम टाकून त्यात सल्फर, कॅल्शियम, टायटॅनिय, ॲल्युमिनिय, मॅगनीझ आणि ऑक्सिजन मुलद्रव्ये असल्याचे स्पष्ट केले. ऑक्सिजन इल्मेनाईट स्वरुपात आहे. त्यामुळे बर्फाशिवाय ऑक्सिजन तयार करण्याचा आणखी एक पर्याय खुला झाला. चंद्रावर सर्वच ठिकाणी बर्फ नसल्याने आता इल्मेनाईट ऑक्सिजन श्वसन घेण्याचा पर्याय खुला होऊ शकतो.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.