Chandrayaan-3 update | चंद्रयान-3 चंद्राच्या आणखी नजिक, विक्रम लॅंडरने पहिले यशस्वी डीबूस्टींग केले, पाठविला चंद्राचा खास व्हिडीओ

विक्रम लॅंडरचा वेग शुक्रवारी डीबुस्टींग प्रक्रीया करुन कमी करण्यात आला आहे. ही प्रक्रीया 20 ऑगस्टलाही केली जाईल. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडरचे सॉफ्ट लॅंंडींग केले जाईल.

Chandrayaan-3 update | चंद्रयान-3 चंद्राच्या आणखी नजिक, विक्रम लॅंडरने पहिले यशस्वी डीबूस्टींग केले, पाठविला चंद्राचा खास व्हिडीओ
moon mission Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 6:40 PM

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : भारताचं महत्वाकांक्षी चंद्रयान-3 ने आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करण्याच्या दिशेने काऊंट डाऊन सुरु केले आहे. काल चंद्रयान-3 चं प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल वेगळे झाले होते. आता पुढचा प्रवास विक्रम लॅंडरला एकट्याने करावयाचा आहे. शुक्रवारी सायं. 4 वाजता चंद्रयानच्या विक्रम लॅंडरने इंजिनांना डीबूस्टींग करुन कक्षा घटविली आहे.  म्हणजेच यानाला ब्रेक लावून त्याचा वेग थोडा कमी केला आहे. आता  113 km x 157 km या कक्षेत ते फिरत आहे.  23 ऑगस्ट रोजी विक्रम लॅंडर चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.

चंद्रयान-3 मोहिम सर्वात स्वस्त म्हणजे अवघ्या 615 कोटी रुपयात राबविण्यात येत आहे.  23 ऑगस्ट रोजी सायं. 5.47 वा. जर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लॅंडीग झाले तर भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. आज शुक्रवारी विक्रम लॅंडरचा वेग कमी करण्यात आला. ही प्रक्रीया 20 ऑगस्टलाही केली जाईल. त्यानंतर चंद्रापासून लॅंडरचे किमान अंतर 30 किमी होईल. सर्वात कमी अंतरावर पोहचल्यानंतर 23 ऑगस्टला सॉफ्ट लॅंडींग होईल.

विक्रम लॅंडरच्या कॅमेऱ्यातून काढलेला चंद्राचा व्हिडीओ येथे पाहा –

याआधी 17 ऑगस्टला चंद्रयान-3 प्रॉपल्शन मॉड्यूलला लॅंडर-रोव्हरपासून वेगळे केले होते. त्यानंतर लॅंडरने प्रॉपल्शन मॉड्यूलला, ‘ थॅंक्स फॉर द राइड मेट’ याच दरम्यान लॅंडरने लावलेल्या कॅमेऱ्यांनी प्रॉपल्शन मॉड्यूलसह चंद्राचे फोटो काढले. इस्रोने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

डीबूस्टींग कसे पूर्ण होणार

द्रयानच्या लॅंडरच्या चारही पायांना 800 न्यूटन शक्तीचे 1-1 थ्रस्टरमुळे ते शक्य होईल, दोन-दोन टप्प्यात ते काम करतील. 30 किमी उंचीवरुन लॅंडींग प्रक्रीया सुरु होईल. लॅंडरचा वेग 1680 मीटर प्रति सेंकदावरुन 2 मीटर प्रति सेंकद आणावा लागेल. लॅंडर आणि रोव्हर शक्तीसाठी सोलर पॅनल लावले आहेत. लॅंडरला व्हर्टीकल शेप आणावे लागेल. त्यानंतर सर्वकाही सुरळीत पडल्यावर लॅंडींग यशस्वी होईल. हे विक्रम लॅंडर 14 दिवस ( चंद्राचा एक दिवस ) काम करणार आहे. जसा सूर्य उगवेल तसे सोलार पॅनल काम सुरु करतील.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.