Chandrayaan 3 Team | आज आपण सेलिब्रेशन करतोय, ते मून मिशनच्या ‘या’ पाच हिरोंमुळे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

| Updated on: Aug 23, 2023 | 7:41 PM

Chandrayaan 3 Team | त्यांच्या मेहनतीमुळे आपण इतिहास रचला. या पाच जणांना मनापासून सॅल्युट. त्यांनी दिवस-रात्र कष्ट घेतले. त्यामुळे तमाम भारतीयांच स्वप्न साकार झालं.

Chandrayaan 3 Team | आज आपण सेलिब्रेशन करतोय, ते मून मिशनच्या या पाच हिरोंमुळे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
Chandrayaan-3 Mission Hero
Follow us on

बंगळुरु : चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास रचला. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला. नासा, युरोपियन स्पेस एजन्सीच्या नजरा भारताच्या या मिशन चांद्रयान-3 कडे लागल्या होत्या. आजच्या या यशामागे अनेक वर्षांपासून काम करणारी इस्रोची टीम आहे. इस्रोच हे तिसर मून मिशन होतं. मागच्या मून मिशनपेक्षा हे वेगळं होतं. इस्रो प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने आज हे यश मिळवलं. त्यांच्यावर जगाची नजर होती.

चांद्रयान-3 च्या तयारीसाठी 3 वर्ष 9 महिने 14 दिवस लागले. या मिशनमागे कोण-कोण आहे, ते जाणून घ्या. भारताने आज इतिहास रचला.

डॉ. एस सोमनाथ : चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेलं बाहुबली रॉकेट डिजाइन केलं

डॉ. एस सोमनाथ इस्रोचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या मिशनच नेतृत्व केलं. चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेलं बाहुबली रॉकेटच त्यांनी डिजाइन केलं होतं. त्याच रॉकेटने चांद्रयान-3 लॉन्च केलं. भारताच हे तिसरं मून मिशन आहे.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स बंगळुरुमध्ये शिक्षण घेणाऱ्या डॉ. एस सोमनाथ यांना मागच्यावर्षी जानेवारीमध्ये जबाबदारी मिळाली होती. चांद्रयान-3 नंतर डॉ. एस सोमनाथ यांच्याकडे दोन मिशन्सची जबाबदारी आहे. यात आदित्य-एल1 आणि गगनयान मिशन आहे.

veeru

पी वीरमुथुवेल: चंद्रावरील शोधांसाठी ओळख

पी वीरमुथुवेल या मिशनचे प्रोजेक्टर डायरेक्टर आहेत. 2019 मध्ये त्यांना मिशनची जबाबदारी मिळाली. पी वीरमुथुवेल याआधी इस्रोच्या हेड ऑफिसमध्ये स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रामचे उपसंचालक होते. इस्रोच्या दुसऱ्या मून मिशनमध्येही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली होती.

तामिळनाडूच्या के विल्लुपुरममध्ये राहणाऱ्या पी वीरामुथुवेल यांनी IIT मद्रासमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. पी. वीरामुथुवेल वीरा नावाने सुद्धा ओळखले जातात.

एस उन्नीकृष्णन नायर : रॉकेट निर्माणाची जबाबदारी

विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे डायेरक्टर आणि एयरोस्पेस इंजीनियर डॉ. उन्नीकृष्णन यांच्याकडे चांद्रयान-3 मिशनशी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली केरळ येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राने जियोसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हीकल (जीएसएलवी) मार्क-III तयार केलं. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समधून शिकणाऱ्या डॉ. उन्नीकृष्णन यांनी चांद्रयान-2 च्या अपयशामधून धडे घेतले. त्यातल्या कमतरता समजून घेतल्या आणि मिशन यशस्वी करण्यासाठी पुन्हा रणनिती बनवली.

एम शंकरन : इस्रोचे सॅटलाइट डिझाइन करण्याची जबाबदारी

एम शंकरन यू आर राव सॅटेलाइट सेंटरचे डायरेक्टर आहेत. या संस्थेकडे इस्रोचे उपग्रह तयार करण्याची जबाबदारी आहे. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिकेशन, नेविगेशन, रिमोट वर्किंग, हवामानाची भविष्यवाणी आणि ग्रहांचा शोध घेण्याची जबाबदारी आहे.

एम शंकरन यांनी 1986 साली भारतीदासन विश्वविद्यालय, तिरुचिरापल्ली येथून फिजिक्समध्ये मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर ते इस्रोच्या URSC सेंटरशी जोडले गेले.

डॉ. के. कल्पना : कोविड काळातही मून मिशनवर काम

डॉ. के. कल्पना चंद्रयान-3 मिशनमध्ये डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. दीर्घकाळापासून त्या मून मिशनमध्ये काम करत आहेत. कोविड काळातही त्यांनी मिशनवर काम सुरु ठेवलं. त्या या प्रोजेक्टवर 4 वर्षापासून काम करत आहेत. डॉ. के. कल्पना सध्या URSC च्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.