नवी दिल्ली : सध्या सगळ्या भारतीयांच लक्ष मिशन चांद्रयानकडे लागलं आहे. चांद्रयान 3 च्या बाबतीत आतापर्यंत सगळ ठरवलंय तसं नियोजनानुसार घडलय. मिशन चांद्रयान 3 साठी आजचा आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. इस्रोकडून चांद्रयान 3 वर आज महत्त्वाच मॅन्यूव्हर परफॉर्म करण्यात आलं. सध्या डी-ऑर्बिटिंगची प्रोसेस सुरु आहे. म्हणजे चांद्रयान 3 मिशन सुरु झालं, तेव्हा यानाची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात आली. आता डी-ऑर्बिटिंगमध्ये चांद्रयान 3 ची कक्षा टप्या टप्याने कमी केली जात आहे,
चांद्रयान 3 ला चांद्रभूमीच्या अधिक जवळ आणलं जात आहे. आज चांद्रयान 3 ला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यात आलं. चांद्रयान 3 वर चंद्राच्या कक्षेतील सर्व मॅन्यूव्हर पूर्ण झाले आहेत.
उद्या महत्त्वाचा टप्पा
आज चांद्रयान 3 ला 153km x 163km कक्षेत स्थापित करण्यात आलं आहे. ही नियोजित कक्षा होती असं इस्रोकडून टि्वटकरुन सांगण्यात आलं. त्यानंतर उद्या प्रोप्लजन मॉड्युलपासून लँडिंग मॉड्युल वेगळ होईल. या लँडिंग मॉड्युलमध्ये विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने चंद्राच्या कक्षेत आज आणि उद्या घडणाऱ्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची इस्रोची योजना आहे.
Chandrayaan-3 Mission:
Today’s successful firing, needed for a short duration, has put Chandrayaan-3 into an orbit of 153 km x 163 km, as intended.
With this, the lunar bound maneuvres are completed.
It’s time for preparations as the Propulsion Module and the Lander Module… pic.twitter.com/0Iwi8GrgVR
— ISRO (@isro) August 16, 2023
एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये करणार प्रवेश
चांद्रयान 3 खूप महत्त्वाच मिशन असून आमच्या सगळ्यांसाठी सॉफ्ट लँडिंग महत्त्वाची आहे असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी सांगितलं. प्रोप्लजन मॉड्युलपासून लँडिंग मॉड्युल 17 ऑगस्टला वेगळं होईल. त्यानंतर लँडिंग मॉड्युलला एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यासाठी इस्रोकडून मॅन्यूव्हर करण्यात येईल.
पेरील्युन कक्षा म्हणजे काय?
पेरील्युन कक्षा म्हणजे चंद्रापासून 30 किमी अंतर आणि एपोल्युन म्हणजे चंद्रापासू 100 किमीची कक्षा. त्यामुळे विक्रम लँडरच्या फायनल लँडिगचा प्रवास याच कक्षेतून सुरु होईल. यावेळी चंद्रावर उतरताना वेग नियंत्रित करण्याच इस्रोसमोर आव्हान असेल.