Chandrayaan-3 Update | चांद्रयान 3 vs लुना 25 चांद्रभूमीवर उतरण्याआधी दोन यानांमध्ये टक्कर होणार?

| Updated on: Aug 11, 2023 | 11:00 AM

Chandrayaan-3 Update | रशियाच्या लुना-25 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी किती दिवस लागतील? लुना-25 किती दिवस चंद्राच्या कक्षेत राहील? लुना-25 चंद्रावर कुठे उतरणार? लुना-25 ची लँडिंग डेट काय?

Chandrayaan-3 Update | चांद्रयान 3 vs लुना 25 चांद्रभूमीवर उतरण्याआधी दोन यानांमध्ये टक्कर होणार?
Chandrayaan 3 vs Luna 25
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली : चांद्रयान 3 प्रमाणे रशियाच्या लुना 25 चांद्र मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. आज 11 ऑगस्टला रशियाच लुना 25 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. 47 वर्षानंतर रशियाची पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. भारताच चांद्रयान 3 आधीच चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. रशियाच लुना-25 काही दिवसात चंद्राच्या कक्षेत दाखल होईल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. रशियाच लुना 25 सुद्धा दक्षिण ध्रुवावरच लँड होणार आहे.

महत्त्वाच म्हणजे दोन्ही मिशनची लँडिंग डेट सारखी म्हणजे 23 ऑगस्ट आहे. चंद्राच्या कक्षेत आधीपासूनच असलेल्या चांद्रयान 3 ने बुधवारी आणखी एक टप्पा पार केला. कक्षा कमी करण्याचा डि-ऑर्बिटिग मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडला.

चांद्रयान 3 च डि-ऑर्बिटिग यशस्वी

डि-ऑर्बिटिग म्हणजे चांद्रयान 3 ला आणखी चंद्राच्या जवळ नेण्यात आलं. आता डि-ऑर्बिटिंगचा आणखी एक मॅन्यूव्हर 14 ऑगस्टला होईल. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लुना-25 मिशनच लाँचिंग होईल. रशियाची अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉस या मिशनची जबाबदारी आहे.

लुना-25 च प्रक्षेपण कुठून होणार?

रशियाच्या फार इस्ट भागातील अवकाश तळावरुन लुना-25 च प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारताच्या चांद्रयान 3 नंतर जवळपास चार आठवड्यांनी लुना-25 च प्रक्षेपण होणार आहे. 14 जुलैला भारताच चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं.

लुना-25 किती दिवस चंद्राच्या कक्षेत राहणार?

लुना-25 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी पाच दिवस लागतील. त्यानंतर हे यान पाच ते सात दिवस चंद्राच्या कक्षेत राहील. त्यानंतर दक्षिण ध्रुवावरील तीन पैकी एका साईट्वर लँडिंग होऊ शकतं. रशियन अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉसने रॉयटर्सला ही माहिती दिली.

दोन्ही यानं परस्परांच्या मार्गात येणार?

भारताच चांद्रयान 3 आणि रशियाच लुना 25 एकाच दिवशी म्हणजे 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही यानांची टक्कर होणार का? ही दोन स्पेसक्राफ्ट परस्परांच्या मार्गात येणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. रॉसकॉसमॉसने या प्रश्नाच उत्तर दिलं आहे. असं काही होणार नाहीय. दोन्ही स्पेसक्राफ्ट परस्परांच्या मार्गात येणार नाहीत. कारण दोघांच लँडिंग एरिया वेगळा आहे. “दोन्ही यानांची टक्कर होण्याचा धोका नाहीय. प्रत्येकाला चंद्रावर भरपूर जागा आहे” असं रॉसकॉसमॉसकडून स्पष्ट करण्यात आलं.