चांद्रयान – 3 या तारखेला होणार लॉंच, ISRO प्रमुखांनी केली घोषणा
चार वर्षांपूर्वी चांद्रयान - 2 मिशनला अगदी शेवटच्या टप्प्यावर अपयश आले होते. त्यामुळे भारताच्या नव्या चांद्रयान - 3 मोहीमेबद्दल खुपच उत्सुकता आहे.
दिल्ली : भारताची महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान – 3 यशस्वी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO इस्रोने कंबर कसली आहे. चांद्रयान – 2 हे मिशन अगदी थोडक्यात हुकल्यानंतर आता भारत नव्या जोमाने चांद्रयान – 3 मिशन यशस्वी करण्याच्या मागे लागला आहे. इस्रोचे प्रमुखांनी चांद्रयान – 3 मिशनची नेमकी तारीख जरी जाहीर केली नसली तर ते जुलै महिन्यात लॉंच केले जाईल अशी माहीती त्यांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांद्रयान – 3 लॉंच केले जाऊ शकते. मार्च महिन्यात या मिशनची पूर्व तयारी म्हणून आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी नेव्हीगेशन उपग्रह एनव्हीएस-01 चे यशस्वी लॉंचिंग झाल्यानंतर चांद्रयान मिशन संबंधी माहीती दिली. श्रीहरीकोटामध्ये एलव्हीएम-3 व्हीईकलने चांद्रयान – 3 लॉंच केले जाणार आहे. या मिशनमध्ये एक ऑर्बिटर, एक रोव्हर आणि लॅंडरचा समावेश असणार आहे.
चांद्रयान – 2 च्या चार वर्षांनंतर चांद्रयान – 3 लॉंच
चांद्रयान – 3 च्या प्रक्षेपणाबाबत चांद्रयान-2 चा रोव्हर दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या चार वर्षांनंतर माहीती देण्यात आली आहे. सूर्य किरणांच्या पासून चंद्राचा जो भाग नेहमीच अलिप्त राहतो त्या भागात चांद्रयान – 3 चे जुलै महिन्यात श्री हरीकोटाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार आहे.
2018 मध्ये लॉंच केले होते चांद्रयान – 2
चांद्रयान – 2 मिशन साल 2018 मध्ये लॉंच केले होते. हे मिशन ऑर्बिटर, लॅंडर आणि रोव्हर अशा तीन टप्प्यात लॉंच केले होते. ऑर्बिटर चंद्राच्या भोवती स्थापित केला गेला होता. परंतू लॅंडर आणि रोव्हर यांचे चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लॅंडींग झाले नाही आणि ते दुर्घटनाग्रस्त झाले.