चंद्रयान-3 च्या कक्षेत बदल केला, आता अंडाकार फेरी मारणार, पृथ्वीपासून 42 हजार किमी दूरुन चक्कर
पृथ्वीपासून चंद्र 3 लाख 8 4 हजार 400 किमीवर अंतरावर आहे. आता पृथ्वीच्या कक्षेत लंबवर्तुळाकार घिरट्या मारणारे चंद्रयान-3 आता 36,500 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पोहचले आहे.
नवी दिल्ली : चंद्रयान-3 चा प्रवास चंद्राच्या भेटीसाठी सुरु झाला असला तरी अजून खूपच अवकाश आहे. चंद्रयान-3 ने ( chandrayaan 3 ) आपली पहिली कक्षा यशस्वीपणे बदलली आहे. आता चंद्रयान पृ्थ्वीभोवती 42 हजार किमी अंतरावरुन अंडाकार प्रदक्षिणा मारणार आहे. चंद्रयान-3 च्या पृथ्वीच्या भोवतीच्या पाच लंबवर्तुळाकार फेऱ्या झाल्या की ते चंद्राच्या कक्षेत शिरणार आहे. चला पाहूया चंद्रभेटीचा हा प्रवास कसा असेल..
चंद्रयान-3 ला काल शुक्रवारी दुपारी आंध्रातील सतिश धवन केंद्रातून बरोबर 2.35 वाजता महाकाय रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने रवाना झाले आहे. लॉंचिंगनंतर चंद्रयान विषुववृत्तावर 179 किमीवरील कक्षेतून आता 36,500 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पोहचले आहे. कक्षा दीर्घ करीत आता ते 36,500 किमीवरून 42 हजार किमीच्या कक्षेत पोहचले आहे. आपल्या पृथ्वीच्या पाच ऑर्बिट ( प्रदक्षिणा ) केल्यानंतर त्याचे चंद्राजवळची कक्षा वाढवत नेली जाणार आहे.
31 जुलै रोजी पृथ्वीपासून 10 पट दूर
चंद्रयाननंतर 31 जुलै रोजी पृथ्वीपासून 10 पट दूर गेलेले असेल तर संशोधक त्याच्या चंद्राच्या बाजूकडील कक्षेत टप्प्या टप्प्याने वाढ करीत आहेत. एका क्षणी ते एक किलोमीटर अंतरावर पोहचल्यानंतर वैज्ञानिक त्याला चंद्राच्या ऑर्बिटमध्ये ढकलतील. पृथ्वीपासून चंद्र 3 लाख 84 हजार 400 किमीवर अंतरावर आहे.
असा होत आहे चंद्रयान-3 चा प्रवास
Chandrayaan-3 Mission update: The spacecraft’s health is normal.
The first orbit-raising maneuver (Earthbound firing-1) is successfully performed at ISTRAC/ISRO, Bengaluru.
Spacecraft is now in 41762 km x 173 km orbit. pic.twitter.com/4gCcRfmYb4
— ISRO (@isro) July 15, 2023
17 ऑगस्टला लॅंडरपासून प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे
इतक्या प्रवासानंतर 5-6 ऑगस्टला चंद्रयान चंद्राच्या कक्षेत गेलेले असेल, त्यानंतर चंद्रयानच्या प्रोपल्शन यंत्रणेला सुरु केले जाईल. आणि त्याला पुढे ढकलेले जाणार आहे. म्हणजे चंद्राच्या 100 किमी कक्षेत पाठविले जाणार आहे. 17 ऑगस्टला प्रोपल्शन सिस्टम चंद्रयानच्या लॅंडर आणि रोव्हरपासून वेगळे होईल. त्यानंतर त्याला चंद्राच्या 100 बाय 30 किमीच्या कक्षेत आणले जाणार आहे.
आता खरी कसोटी सुरु
23 ऑगस्टला त्याचा वेग कमी केला जाईल. हे कठीण काम असणार असून येथून त्याची लॅंडींग सुरु होईल. यंदा लॅंडींग क्षेत्रफळ चंद्रयान-2 पेक्षा वाढविले आहे. विक्रम लॅंडरच्या पायाच्या ताकदीत वाढ केली आहे. नवीन सेंसर्स लावले आहेत. जर चुकीच्या जागी लॅंडींग झाली तर पुन्हा जागच्या जागी हॉवरक्राफ्टप्रमाणे ते पुन्हा हवेत उचलून दुसऱ्या चांगल्या जागी लॅंडींग करण्याचाही पर्याय ठेवण्यात आला आहे. मागच्या मोहिमेतून हा धडा इस्रोने घेतला आहे.