न्याय व्यवस्थेत बदल ते दारूगोळा बनविण्याचे कारखाने; थोरले माधवराव पेशव्यांबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
माधवराव पेशवे यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1745 रोजी बाळाजी बाजीराव यांच्या पोटी झाला. बाळाजी बाजीराव यांना तीन मुले होते. थोरले विश्वासराव, मधले माधवराव व धाकटे नारायणराव यापैकी विश्वासराव यांना पानिपतच्या युद्धात वीर मरण आल्याने पेशवाईची जबाबदारी ही माधवरावांच्या खांद्यावर आली.
माधवराव (Madhavrao Peshwa) यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1745 रोजी बाळाजी बाजीराव यांच्या पोटी झाला. बाळाजी बाजीराव (Balaji Bajirao) यांना तीन मुले होते. थोरले विश्वासराव, मधले माधवराव व धाकटे नारायणराव यापैकी विश्वासराव यांना पानिपतच्या युद्धात (Battle of Panipat) वीर मरण आल्याने पेशवाईची जबाबदारी ही माधवरावांच्या खांद्यावर आली. जेव्हा माधवराव यांनी पेशवाईचे सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. माधवराव लहान असल्याने त्यांचे चुलते रघुनाथराव हेच पेशवाईचा कारभार पहात होते. वास्तविकपणे माधवराव हे जरी अल्पवयीन होते, मात्र तरी देखील ते अत्यंत बुद्धिमान आणि शूर होते. त्यांनी पेशवाईतील घडामोडी मोठ्या सूक्ष्म रितीने अवलोक केल्या होत्या. त्यांना राज्यकारभार कसा चालवावा याची समज होती. तसेच माणसांची पारख करण्याचा अद्वभूत गुण त्यांच्या ठाई होता. माधवराव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम, हैदर अली यांचा बंदोबस्त केला. त्यांनी उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व प्रस्थापित केले. स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून माधवराव यांनी न्याय खात्यात अनेक सुधारण केल्या.
प्रजा हितदक्ष पेशवे
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्याकडे एक प्रजाहितदक्ष पेशवे म्हणून पाहिले जाते. त्यांनी जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. माधवराव हे एक न्यायप्रीय पेशवा होते. जनतेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रचलित न्यायव्यवस्थेमध्ये अनेक बदल केले. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश हे माधवराव पेशवे यांच्याच काळात तयार झाले. आजही न्यायदानाचा विषय निघाला की, रामशास्त्री प्रभुणे यांचा आवर्जून उल्लेख होतोच. माधवराव पेशवे यांनी राज्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. राज्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी त्यांनी तोफा व दारूगोळा बनविण्याचे कारखाने सुरू केले. त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी त्यांनी टांकसाळीची देखील व्यवस्था केली. एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.
निजाम, हैदरचा बंदोबस्त
पानिपच्या युद्धामध्ये मराठ्यांची मोठी हानी झाली. पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे यांचा देखील मृत्यू झाला. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर मराठ्यांवर स्वारी करण्याची हीच योग्यवेळ असल्याचे वाटून, निजाम मराठ्यांवर चालून आला. त्यावेळी राघोबा यांनी राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्याला गाठून लढाई सुरू केली. मात्र या लढाईमध्ये राघोबांची ताकत कमी पडली. राघोबा यांचा पराभव समोर दिसत असतानाच माधवराव यांनी राघोबा यांच्या मदतीला सैन्य पाठवले आणि ही लढाई पेशव्यांनी जींकली. निजामाचा पराभव झाल्याने त्याने अखेर पेशव्यांशी तह केला. मात्र पुढे राघोबा आणि माधवराव पेशवे यांच्यात वैमनस्य आल्याने या संधीचा फायदा घेऊन निजमाने मराठाच्या ताब्यात गेलेला आपला बराचसा प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. निजामाप्रमाणे हैदरानेही या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला होता. मात्र माधवराव केवळ युद्धातच कुशल नव्हते, तर ते अतिशय चाणाक्ष राजकारणी देखील होते. त्यांनी घराबाहेरील क्षत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी 1764 साठी राघोबा यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले आणि ते त्यात यशस्वी देखील झाले. राघोबा आणि माधवराव एकत्र आल्याने त्यांची ताकद दुप्पट वाढली. त्यानंतर राघोबा यांनी हैदरवर स्वारी करू, आपला प्रदेश परत मिळवला सोबतच युद्धाच्या खर्चापोटी हैदरकडून 32 लाख रुपयांची वसुली केली. माधवराव पेशवांनी लाढाईपेक्षा आपल्या चाणक्ष बुद्धीच्या जोरावरच अनेक क्षत्रुंवर विजय मिळवले.
माधवरावांचा मृत्यू
1772 मध्ये पुन्हा एकदा माधवराव यांनी हैदरवर स्वारी केली होती. मात्र याच स्वारीदरम्यान माधवराव आजारी पडले. पुढे त्यांना क्षय झाला. आयुष्यभर अजय असलेल्या या विरास आपल्या आजाराला मात्र हरवता आले नाही. क्षयामुळे त्यांचा 18 नोव्हेंबर 1772 रोजी मृत्यू झाला. मृत्यू झाला तेव्हा ते अवघ्या 28 वर्षांचे होते. माधवराव यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांच्या पत्नी रमाबाई या देखील सती गेल्या. त्यांनी आपल्या अवघ्या 11 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये राज्याची घडी व्यवस्थित बसवली. पानिपतच्या युद्धानंतर राज्याची घडी पुन्हा बसवणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते. मात्र त्यांनी ते करून दाखवले. त्यांनी रघुनाथराव यांचा उपयोग मोठ्या कैशल्याने करून घेतला. त्यांनी आपल्या राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाला प्रारंभ झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
संबंधित बातम्या
राजू शेट्टी करणार महावितरणसमोर उपोषण; …आणि या मंत्र्याच्या कार्यालयावरही काढणार मोर्चा
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात नाही, कारण काय?, अर्थसंकल्प 11 मार्च रोजी