तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? इथे चेक करा

मुंबई : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे. हे 12 अंकी कार्ड यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI जारी करते. हे एक डिजीटल आयडी प्रुफ आहे, याच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकता. गेल्या अनेक वर्षांपासून आधार कार्डशी छेडछाड होत असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. आधार कार्डच्या माध्यमातून […]

तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? इथे चेक करा
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे. हे 12 अंकी कार्ड यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI जारी करते. हे एक डिजीटल आयडी प्रुफ आहे, याच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकता.

गेल्या अनेक वर्षांपासून आधार कार्डशी छेडछाड होत असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. आधार कार्डच्या माध्यमातून नागरिकांची खाजगी माहिती लीक केली जाते, तसेच यामध्ये फेरबदल करुन आधार कार्डचा चुकीचा वापर केला जातो, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे आपल्या आधार कार्डाचा वापर कुठे होतोय, याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं जातं हे कसं तपासाल?

स्टेप 1 – पहिले  https://uidai.gov.in/ या वेबसाईटला लॉग इन करा. त्यानंतर माय आधारवर क्लिक करा. त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या सेक्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 2 – त्यानंतर रिडायरेक्टेड पेजवर जा. तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक CAPTCHA यासह टाका. त्यानंतर ओटीपी सेंडवर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

स्टेप 3 – पुढील पेजवर जा. पहिलं ऑप्शन ऑथेंटिकेशन टाईप निवडा आणि ऑल म्हणून डिफॉल्ट सेट करा.

स्टेप 4 – पुढील पेजवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व आधार ऑथेंटिकेशन रिक्वेस्टची लिस्ट दिसेल. या लिस्टला पीडीएफ फॉर्ममध्ये डाउनलोड करता येतं. ही लिस्ट ओपन करण्यासाठी पासवर्डची गरज असते. ही लिस्ट बघण्यासाठी तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्म तारिख टाका.

त्यानंतर या लिस्टमध्ये तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरलं गेलं याची माहिती मिळेल. जर या लिस्टमध्ये तुम्हाला काही संशयास्पद वाटलं, तुमचं आधार सुरक्षित नसेल. त्यासोबत छेडछाड करण्यात आली असेल. तर तुम्ही UIDAI ला संपर्क साधून याबाबत तक्रार करु शकता. त्यासाठी तुम्ही 1947 या क्रमांकावर संपर्क करु शकता किंवा help@uidai.gov.in या वेबसाईटवरही आपली तक्रार नोंदवू शकता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.