शिकारी खुद शिकार ना हो जाए, 70 वर्षांनी भारतात चित्ते, यंत्रणेला सतावतेय ही भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्या नामिबियातून 8 चित्ते भारतात येत आहेत. मात्र संपूर्ण यंत्रणेला एक भीती सतावत आहे.

शिकारी खुद शिकार ना हो जाए, 70 वर्षांनी भारतात चित्ते, यंत्रणेला सतावतेय ही भीती
90 टक्के चित्ते लहान असतानाच इतर प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतातImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 6:00 PM

नवी दिल्लीः तब्बल सात दशकांनंतर भारतात चित्त्याचं (Cheetah) दर्शन होणार आहे. 70 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतीय जंगलांतून (Indian Forest) लुप्त झाला होता. आता नामिबियातून (Namibia) उद्या 8 चित्ते भारतात आणले जात आहेत. अनेक प्राणी आणि निसर्गप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण आशिया खंडासाठीच या निमित्ताने आशादायी संकेत मिळत आहेत. कारण आशिया खंडात सध्या फक्त 12 चित्ते आहेत. भारतात आलेले चित्ते येथे स्थिरावले आणि त्यांची संख्या वाढली तर हे खूप मोठं यश समजलं जाईल. पण या चित्त्यांबाबत एक भीतीदेखील आहे.

जंगलात चित्त्यांचे शत्रू कोण?

चित्ता एक चपळ प्राणी आहे. मात्र जंगलात त्याचे खूप शत्रू असतात. वाघ, बिबट्या, लांडगे हे चित्त्याच्या मागावर असतात. संधी दिसताच ते चित्त्यावर डाव साधतात. चित्त्याच्या शावकांना तर जंगली कुत्रीही सहज खातात.

95 टक्क्यांपेक्षा जास्त चित्ते लहानपणीच जंगलात मारले जातात, असं म्हणतात. 70 टक्के चित्ते 3 महिन्यांचे व्हायच्या आतच मारले जातात. चित्त्यांची संख्या कमी होण्यामागचं एक मोठं कारण हेदेखील आहे. सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीजचे डायरेक्टर उल्लास कारंथ यांनी नॅशनल जिओग्राफिकशी बातचित केली. ते म्हणतात, चित्ते आणायला हरकत नाही. पण अचानकपणे चित्ते ७० वर्षानंतर माणसांच्या जंगलात सोडले जाणार, हे पचणं जरा कठीण जाऊ शकतं..

‘बांधून ठेवता येणार नाही’

हे चित्ते मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये बांधून ठेवता येणार नाहीत. मात्र जंगलाच्या बाहेर त्यांच्यासाठी धोका असू शकतो. रस्ता चुकून ते दूर गेले तर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते. या चित्त्यांवर 24 तास लक्ष ठेवण्याचं आव्हान आहे.

चित्त्यांची शिकार झाली नाही तरी ते स्वतःच उपासमारीने मरू शकतात. आपल्यापेक्षा कमी शक्तीशाली आणि कमी वजनाच्या प्राण्यांचीच ते शिकार करतात. त्यामुळेच वाघ, सिंह, बिबट्यांसारखे प्राणी त्याची शिकार करतात.

आपल्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं या प्राण्याला सहन होत नाही. उल्हास कारंथ म्हणतात, 2009 मध्ये भारतात चित्ते आणण्यावर अनेकांची सहमती नव्हती. मात्र पर्यावरण मंत्र्यांना काहींनी या प्रकल्पाची भुरळ घातली.

एकदा का चित्ते बाहेर आले तर बाहेरील गावं, शेत आणि कुत्र्यांच्या जीवावर बेतू शकतं. पण चित्त्यांच्या मानेत कॉलर लावल्याचा तर्क प्रशासनातर्फे देण्यात येतोय.

एकूणच या मतभेदांनंतरही उद्या 8 चित्ते भारतात येत आहेत. काही काळानंतर या आरोप-प्रत्यारोप आणि भीतींतील वास्तविकता समोर येईल.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.