10वी परीक्षेत शेतकरी आंदोलनाचा ‘हिंसक’ असा उल्लेख, उपद्रवींपासून वाचण्यासाठी उपायांबाबत विचारला प्रश्न!
इंग्रजी भाषेच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेतील लेटर टू एडिटर या सदरात आंदोलकांना 'violent maniacs' असं म्हणण्यात आलं आहे.
चेन्नई : शहरातील प्रसिद्द CBSC स्कूल आता विवादात सापडलं आहे. कारण, या शाळेत 10 वीच्या विद्यार्थ्यांना राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली. त्यावेळी झालेल्या हिंसाचारावरुन या परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला आहे. विचारलेल्या प्रश्नात आंदोलकांचा उपद्रवी आणि हिंसक उन्मादी असा उल्लेख करण्यात आला आहे. इंग्रजी भाषेच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेतील लेटर टू एडिटर या सदरात आंदोलकांना ‘violent maniacs’ असं म्हणण्यात आलं आहे. इतकच नाही तर या प्रश्नामध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत आपले विचार मांडण्यास सांगितलं गेलं आहे.(chennai schools exam paper calls protesting farmers violent maniacs)
11 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. त्या प्रश्नपत्रिकेत हिंसक आंदोलकांपासून कशाप्रकारे वाचलं गेलं पाहिजे, याबाबत उपाय विचारले आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे की, अशा हिंसक आंदोलकांचा सामना कशाप्रकारे केला जावा, जे बाहेरील विचारांच्या प्रभावात येऊन कार्य करतात.
संगीतकार टीएम कृष्णा यांच्याकडून प्रश्न ट्वीट
संगीतकार टीएम कृष्णा यांनी प्रश्नपत्रिकेतील तो वादग्रस्त प्रश्न ट्वीट केला आहे. सोशल मीडियावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर संतापही व्यक्त करत आहेत. हा चेन्नईतील एका प्रतिष्ठित शाळेतील 10वी चा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. कृषी कायदे आणि प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर अद्याप चर्चा सुरु आहे. असं असताना इथं आंदोलकांना ‘हिंसक उन्माद’ बोललं गेलं आहे
This is a sample fm a Class X English paper of a popular Chennai school. The incident and the much larger farm bills issue is still being discussed but here this is being said ‘violent maniacs under external instigation’ pic.twitter.com/N27ooheHJV
— T M Krishna (@tmkrishna) February 19, 2021
नेमका प्रश्न काय?
‘प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे लोकांचे मन निंदा आणि घृणाने भरले आहे. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान केलं. तसंच दिवसाढवळ्या पोलिसांवर हल्ला चढवला. अशावेळी आपल्या शहरातील एका दैनिकाच्या संपादकाला पत्र लिहा, त्यात आंदोलकांच्या हिंसक कृत्याची निंदा करा, जे हे जाणून घेण्यात कमी पडले की देश वैयक्तिक गरजा आणि फायद्याच्या आधी येतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, राष्ट्रध्वजाचा अपमान करणं आणि पोलिसांवर हल्ला करणं हे त्या अपराधांपैकी एक आहेत, जे कधी कुठल्याही कारणामुळे योग्य ठरवले जाऊ शकत नाहीत’.
संबंधित बातम्या :
chennai schools exam paper calls protesting farmers violent maniacs