मोबाईलवरती बोलणं चालकाला महागात पडलं, वेगात असलेल्या बसने डिव्हायडर तोडला, घाबरलेल्या प्रवाशांनी…
अशाचं पद्धतीचा अपघात एप्रिल महिन्यात झाला होता, त्यावेळी ४० लोकं जखमी झाली होती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. तो अपघात सुध्दा छत्तीसगड राज्यात झाला होता.
नवी दिल्ली : चालक मोबाईलवरती (Mobile) बोलत असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस इतक्या वेगात होती की, बसने रस्त्यावरीत डिव्हायडर तोडला आहे. हा अपघात छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील घारघोडा परिसरात एका पूलावर झाला आहे. ज्यावेळी अपघात झाला झाला, त्यावेळी बसमध्ये एकूण २६ प्रवासी होते. अपघात झाल्यानंतर लोकांनी इतका गोंधळ घातला की, अपघात पाहणाऱ्या लोकांना घाम फुटला होता. त्याधील दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. सगळ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी ज्यावेळी काही प्रवाशांची चौकशी केली, त्यावेळी चालक मोबाईलवरती (talking on phone) बोलत असल्याचं दिसून आला.
त्यावेळी ४० लोकं जखमी झाली होती
याचं पद्धतीचा अपघात एप्रिल महिन्यात झाला होता, त्यावेळी ४० लोकं जखमी झाली होती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. तो अपघात सुध्दा छत्तीसगड राज्यात झाला होता. त्यावेळी सुध्दा तिथल्या लोकांनी तात्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी गाडी चालवताना मोबाईलवरती चालकांनी बोलू नये असं आवाहन सु्ध्दा केलं होतं.
#WATCH | Chhattisgarh | 26 people injured, including two critically injured, after a speeding bus lost control and rammed into a bridge. The incident occurred at a bridge near Gharghoda in Raigarh district.
SDOP Deepak Mishra says, “A total of 26 people are injured. Two… pic.twitter.com/mezuKaNW0X
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 19, 2023
१९ प्रवासी थोडक्यात बचावले
मोबाईलवरती बोलत असताना देशात अनेकदा अपघात झाला आहे. बाईक, कार किंवा इतर मोठी वाहनं चालवत असताना मोबाईलचाा वापर करु नका असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. तरी सुध्दा अशा पद्धतीने वाहन चालवत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मोबाईलवरती बोलत असताना सापडल्यास अनेकांवरती कारवाई सुध्दा केली आहे. १९ प्रवासी थोडक्यात बचावले नाहीतर मोठा अपघात झाला असता.