DJ च्या दणदणाटाने मेंदूची रक्तवाहिनीच फुटली, तरुणाचे गोठले रक्त, डीजेसमोर नाचण्यापूर्वी दहादा तरी विचार करा

DJ Brain Hemorrhage : राज्यात काही ठिकाणी डीजेच्या दणदणाटाने खिडक्यांची तावदानांना तडे गेल्याच्या घटना घडल्या तर काही भागात या कर्णकर्कश आवाजाने ज्येष्ठांना त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. DJ च्या दणदणाटाने ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना समोर आली आहे.

DJ च्या दणदणाटाने मेंदूची रक्तवाहिनीच फुटली, तरुणाचे गोठले रक्त, डीजेसमोर नाचण्यापूर्वी दहादा तरी विचार करा
डीजेच्या दणदणाटाने मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 12:19 PM

DJ च्या दणदणाटाने ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना छत्तीसगड राज्यात समोर आली आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने या व्यक्तीला गरगरल्यासारखे झाले. तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याला तातडीने रायपूर येथील रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फाटल्याचे आणि रक्त गोठल्याचे आढळले. डीजे दणदणाटामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

सीटी स्कॅनमधून समोर आली बाब

बलरामपूर येथील 40 वर्षीय संजय जायसवाल याला 9 सप्टेंबर रोजी अचानक चक्कर आले. त्याला उलटी पण झाली. त्यामुळे घरची मंडळी एकदम घाबरुन गेली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथल्या नाक, कान, घसा तज्ज्ञाने तातडीने उपचार सुरू केले. त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्याच्या डोक्याच्या पाठीमागील रक्तवाहिनी फुटल्याचे आणि रक्त गोठल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्टांनी कुटुंबियांकडे त्याला एखादा आजार होता का याची माहिती विचारली. पण तो काल परवा पर्यंत तंदुरुस्त होता हे स्पष्ट झाले. तर डीजेचा दणदणाट त्याला सहन न झाल्याने नस फाटल्याचे समोर आले. त्याचा बीपी सुद्धा नॉर्मल असल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा

धार्मिक उत्सावादरम्यान डीजे वाजविण्याचे प्रकार हल्ली वाढले आहे. लग्न कार्यात सुद्धा डीजेच्या दणदणाटासमोर नाचणारी अबालवृद्ध सर्रास दिसतात. पण त्यामुळे त्यांना त्रास होत असल्याच्या घटना पण समोर येत आहे. याच कारणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

किती डेसिबलची क्षमता?

एक तंदुरुस्त व्यक्ती 70 डेसीबल ध्वनीची तीव्रता सहन करु शकतो. त्यापेक्षा अधिक आवाज असेल, गोंगाट, दणदणाट, कर्णकर्कश आवाज असेल तर त्याच्या कानावर आणि मेंदूवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो, असे डॉक्टरांचे मत आहे. डीजेचा दणदणाट हा 150 डेसीबल वा त्यापेक्षा पण अधिक असतो. धार्मिक कार्यक्रम, लग्नादरम्यान ज्या मिरवणुका जातात. त्या गेल्यावर घरातील अनेक वस्तूंना हादरे बसत असल्याचे जाणवते. त्यामुळे डीजेसमोर नाचणाऱ्यांच्या कानावर आणि मेंदूवर त्याचा किती विपरीत परिणाम होत असेल हे सांगायला नको. महाराष्ट्रात अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी घातली आहे. तसेच डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.