लग्न न झालेल्या मंडळींना मिळणार पेंशन, बॅचलर लोकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

ग्रामीण भागात वाढती बरोजगारी, महागाई आणि लैंगिक असमानता त्यामुळे अनेक मंडळींची लग्नं होत नाहीत, त्यामुळे त्यांना उर्वरित आयुष्य एकाकी निराधारपणे काढावे लागत आहे.

लग्न न झालेल्या मंडळींना मिळणार पेंशन, बॅचलर लोकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
groom and brideImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 5:44 PM

दिल्ली : शादी का लड्डू जो खाये वो पछताए जो ना खाए वो भी पछताए असे गंमतीनं म्हटलं जात असलं तरी म्हातारपणी आपल्याला आधार हवाच असतो. त्यामुळे ‘कुंवारा’ मरायचं नाही, कधी तरी लग्न होईल या आशेवर लोक दिवस ढकलत जगत असतात. अशा मंडळींसाठी आता एक नवीन योजना आकार घेत आहे. या योजनेमुळे लग्नच न झालेल्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. आता त्यांच्या खात्यावर दर महिन्याला पेन्शन जमा होणार आहे.

ग्रामीण भागात वाढती बरोजगारी, महागाई आणि लैंगिक असमानता त्यामुळे अनेक मंडळींची लग्न होत नाहीत, त्यामुळे त्यांना उर्वरित आयुष्य एकाकी निराधारपणे काढावे लागत आहे. अशा व्यक्तींसाठी आता नविन योजना आकारास येत आहे. हरियाणा सरकारने आता अशा लग्न झालेल्या मंडळींचा प्रथमच विचार केला आहे. एका लोकसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा विवाह न झाल्याने एकटे निराधार आयुष्य कंठणाऱ्या व्यक्तींना होणार आहे.

सवा लाख अविवाहीतांना फायदा

या योजनेत वय 45 ते 60 वयापर्यंत अविवाहीत राहीलेल्या पुरुष आणि स्रियांना मिळणार आहे. परंतू ही पेन्शन त्याच व्यक्तीला लागू होईल ज्या अविवाहीत मंडळीचं वार्षिक उत्पन्न 1.80 लाखाहून कमी आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहीतीनूसार या योजनेचा फायदा हरियाणा राज्यातील सवा लाख अविवाहीत लोकांना मिळणार आहे. एका महिन्यात ही योजना लागू होणार असून अशी योजना तयार करणारे हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

मुलींना विकत आणले 

हरियाणात साल 2011 मध्ये दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 879 होते. ते आता 917  इतके झाले आहे. हरियाणात एक लाख 35 हजार मुलींचे लग्नाचे वय उलटून त्या आता वयस्कर झाल्या आहेत. या मुलींना पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड येथून विकत आणले होते. यातील काही मुलींना गरीबीमुळे पालकांनीच विकले होते. तर काही दिल्ली मार्गे हरियाणात आलेल्या आहेत. अविवाहीतांबरोबरच गरीब विधूरांनाही पेन्शन देण्याचा विचार सुरु आहे.

आदर्श व्यवस्था 

हरियाणात वृद्ध, विधवा, दिव्यांगांना पेन्शन दिली जाते. तसेच शारीरिक व्यंग तसेच तृतीय पंथीयांना आर्थिक मदत केली जाते. तसेच केवळ कन्यारत्न झालेल्या पालकांपैकी आई किंवा वडील यापैकी एकाचे निधन झाले तर 45 ते 60 वयापर्यंत आर्थिक मदत म्हणून 2,750 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.