Aadhaar Card |  पालकांनो लहान मुलांचे आधार कार्ड बनवलेत का? लवकरच भासू शकते गरज…

लहान मुलांचे आधार कार्ड वेगळ्या प्रकारे बनवले जाते, ज्याला ‘बाल आधार’ म्हणतात. जर तुम्ही देखील तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवले नसेल, तर सर्वात आधीही ही प्रक्रिया पूर्ण करा.

Aadhaar Card |  पालकांनो लहान मुलांचे आधार कार्ड बनवलेत का? लवकरच भासू शकते गरज...
लहान मुलांचे आधार कार्ड वेगळ्या प्रकारे बनवले जाते, ज्याला ‘बाल आधार’ म्हणतात.
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 5:03 PM

मुंबई : दिल्ली सरकारने लहान मुलांच्या नर्सरी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासगी शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले की, शैक्षणिक सत्र 2021-22 साठी नर्सरी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल. या आठवड्यात नर्सरी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक दिल्लीत जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. नर्सरी प्रवेश सुरू झाल्यानंतर पाल्याच्या अनेक प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. यापैकीच एक असणार आहे आधार कार्ड! (Child Aadhaar Card compulsory for nursery admission know the process)

या प्रवेश प्रक्रियेदरम्यान आपल्यास आपल्या मुलाचे आधार कार्ड विचारले जाईल. बर्‍याच वेळा बर्थ सर्टिफिकेटवर काम चालवले जाते. मात्र, जर आधार कार्डची मागणी केली तर अडचण येते. म्हणूनच आपल्या मुलाचे आधार कार्ड आधीपासून बनवून घ्या. लहान मुलांचे आधार कार्ड वेगळ्या प्रकारे बनवले जाते, ज्याला ‘बाल आधार’ म्हणतात. जर तुम्ही देखील तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवले नसेल, तर सर्वात आधीही ही प्रक्रिया पूर्ण करा. लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी काय करावे लागेल, हे जाणून घेऊया…

मुलांचे आधार कार्ड कसे वेगळे आहे?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण नवजात मुलांचे देखील आधार कार्ड तयार करते. अशा परिस्थितीत अगदी लहान मुलांसाठी देखील आधार कार्ड मिळू शकेल. खास गोष्ट म्हणजे मुलांचे आधार कार्ड सामान्य आधार कार्डपेक्षा वेगळे असते, त्यास ‘बाल आधार कार्ड’ असे म्हणतात. हे आधार कार्ड स्वतंत्र नाही, ते एका पालकांच्या आधार कार्डाशी जोडलेले असते आणि ते जोडले जाणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवले जाते, तेव्हा त्यांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जात नाही. वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर तो अपडेट करावा लागतो (Child Aadhaar Card compulsory for nursery admission know the process).

बाल आधार कार्ड कसे बनवायचे?

5 वर्षाखालील मुलांसाठी आधार कार्ड बनवण्यासाठी आधार केंद्रात जावे. त्यांचा नोंदणी फॉर्म केंद्रात जाऊन भरावा लागेल. यासाठी मुलांचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासह, आपल्याला पालकांच्या आधारची एक प्रत देखील द्यावी लागेल. वास्तविक, अशा परिस्थितीत मुलांचा आधार वडिलांच्या किंवा आईच्या आधारशी जोडला जातो.

पालकांना त्यांचे मूळ आधार कार्डही सोबत न्यावे लागेल. मुलांच्या आधार कार्डमध्ये फक्त फोटो क्लिक केले जातात, त्यांचे रेटिना घेतले नाहीत. जर पालकांकडे आधार कार्ड नसेल, तर अशा परिस्थितीत मुलांचे आधार कार्ड बनवता येणार नाही.

त्याच वेळी, 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे आधार कार्ड देखील या प्रकारे तयार केले जात आहे. तथापि, बायोमेट्रिक आणि रेटिना पाच वर्षांच्या वयाच्या नंतर घेतले जातात. आपल्यालाही आपल्या मुलांचा नव्याने शाळेत प्रवेश घ्यायचा असेल असेल, तर आधार कार्ड आधीपासूनच तयार करा जेणेकरुन आपल्याला नंतर कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही.

बायोमेट्रिकशिवाय आधार कार्ड बनवता येईल का?

असे बरेच दिव्यांग आहेत ज्यांचे हात किंवा बोटं नाहीत. किंवा अनेक लोकांच्या आजारामुळे बायोमेट्रिक ट्रेसिंग येत नाहीत. अशा परिस्थितीतही आधार कार्ड बनवण्याची तरतूद आहे. बोट आणि रेटीना नसतानाही किंवा दोन्हीही नसले तरीही आपण आधारसाठी नोंदणी करू शकता. आधार सॉफ्टवेअरमध्ये असे अपवाद स्वीकारण्याची तरतूद आहे.

(Child Aadhaar Card compulsory for nursery admission know the process)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.