भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये लहानमुलांचा मृत्यू

यूपी ड्रग कंट्रोलर आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सिरपचे नमुने चंदीगढला पाठवण्यात आले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये लहानमुलांचा मृत्यू
UzbekistanImage Credit source: Uzbekistan
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 12:31 PM

दिल्ली : एका भारतीय कंपनीच्या कफसिरफने (Cough Syrup) उजबेकिस्तानमध्ये डिसेंबर महिन्यात लहानमुलांचा मृत्यू झाल्याने ( WHO) जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर प्रदेशातील नोयडा स्थित मॅरीयन बायोटेक कंपनीच्या कफ सिरफवर बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या अलर्टमध्ये, मॅरीयन बायोटेकने बनविलेले वैद्यकीय उत्पादने गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहेत आणि म्हणून वापरली जाऊ नयेत असे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अलर्टनूसार अंबरोनॉल सिरफ आणि DOK-1 मॅक्स सिरप यांच्यात दोष आढळला आहे. ही सिरफ उत्तर प्रदेशातील मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तयार केले असून त्यांनी निकष पाळलेले नसल्याचे उघड झाले आहे. हे खोकल्यावरील सिरफ घेतल्याने उजबेकिस्तानमध्ये काही मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असल्याने ही फार्मा कंपनी अडचणीत आली आहे.

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये या खोकल्याच्या सिरपच्या नमुन्यांच्या विश्लेषण केले, तेव्हा त्या दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळल्याचे म्हटले जात आहे.

उझबेकिस्तान (Uzbekistan) सरकारनं नोएडास्थित मॅरियन बायोटेकचं खोकल्यावरील सिरप ‘डॉक-1 मॅक्स’ला मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. आतापर्यंत मॅरियन बायोटेकनं डब्ल्यूएचओला या उत्पादनांच्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची हमी दिलेली नाही, असं सांगितलं जात आहे. उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपमुळेच झाल्याचा दावा केला जात आहे.

आता भारत सरकारनेही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या सूत्रांनी सांगितले होते की, हे सिरप सध्या भारतीय बाजारात विकले जात नाहीये.

डॉक -1 मॅक्स सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉलची जादा मात्रा असल्याने गाम्बियामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला होता.आफ्रिकन देश गाम्बियामध्ये 2022 मध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे 60 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. परंतु, भारतीय सिरपमुळेच गाम्बियामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.