चीन सातत्याने वाढवतोय अणूबॉम्बची संख्या, 2030 पर्यंत चीनची अण्वस्रं दुप्पट होणार, अमेरिकेचा अहवाल
जगात इतकी अण्वस्रं आहेत की आपल्या पृथ्वीचा अनेकदा विध्वंस होऊ शकतो. आता चीनने अण्वस्रं निर्मितीचा वेग प्रचंड वाढविल्याचा अहवाल अमेरिकेने सादर केला आहे.
वॉशिंग्टन | 20 ऑक्टोबर 2023 : चीन आपल्या अण्वस्रामध्ये ( Nuclear Weapons ) वेगाने वाढ करीत आहे. गेल्या एक वर्षात चीनने आपल्या अणूबॉम्बच्या साठ्यात वाढ करीत 500 अण्वस्र तयार केली आहे. येत्या सात वर्षांत चीनच्या अणूबॉम्बची संख्या जवळपास दुप्पट होणार असल्याचे पेंटागानच्या ( Pentagon report ) वार्षिक अहवालात म्हटले आहे. साल 2030 पर्यंत चीनच्या अण्वस्रांची संख्या 1000 हून अधिक होणार आहे. चीनच्या अण्वस्राच्या ज्या गतीने वाढ होत आहे ती अंदाजापेक्षा जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
साल 2021 मध्ये चीनकडे 400 अणूबॉम्ब होते. जे आता 500 हून अधिक झाल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. चीनला आम्ही काही सल्ला देत नाही, परंतू त्यांनी अंदाजापेक्षा जास्त अण्वस्रांची निर्मिती केल्याचे अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे. ही अमेरिकेला आणि जगाला चिंता करणारी गोष्ट आहे. चीनने 1000 अण्वस्रांच्या आपल्या लक्ष्याला गाठण्यासाठी अंदाजा अधिक वेगाने पुढे जात आहे. पिपल्स लिबरेशन आर्मी मोठी रॉकेट विकसित करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे चीनची क्षमता वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
रशिया आणि अमेरिकानंतर चीनकडे जादा अण्वस्रे
चीन अण्वस्राबाबत जगातील तिसरी मोठी शक्ती आहे. त्यांच्यानंतर केवळ रशिया आणि अमेरिकेकडे जादा अण्वस्र आहेत. रशियाकडे 5,889 अण्वस्र आहेत. त्यानंतर अमेरिकेकडे 5,244 अण्वस्र आहेत. दोन्ही देशांकडे जगातील 90 टक्के अणूबॉम्ब आहेत. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनकडे 500 अण्वस्र आहेत.
भारतापेक्षा पाकिस्ताकडे जादा अण्वस्र
आपल्या पृथ्वीला अनेकदा नष्ट करु शकतील इतकी अण्वस्रे जगात आहेत. फ्रान्सकडे 290 अण्वस्र असून तो जगात तिसरा देश आहे. पाकिस्तानचा या यादी सहावा क्रमांक आहे तर भारताचा सातवा. पाकिस्तानकडे 170 अणूबॉम्ब आहेत. तर भारताकडे 164 अण्वस्र आहेत. त्यानंतर इस्रायलकडे 90 अण्वस्र तर उत्तर कोरियाकडे 30 अण्वस्र आहेत.
कोणाकडे किती अण्वस्रे पाहा
रशिया – 5,889
अमेरिका – 5,244
चीन – 500
फ्रान्स – 290
ब्रिटन – 225
पाकिस्तान – 170
भारत – 164
इस्रायल – 90
उ. कोरिया – 30