Video: …आणि चीनची सेना LAC वरुन माघारी फिरली ! हा घ्या पुरावा !
चीनची सेना बॉर्डरवर गोंधळ घालत होती. पण, शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्याचा पुरावा भारतीय लष्करानं आज जारी केला आहे. (China take back Public Liberation Army from LAC watch video )
नवी दिल्ली: जवळपास गेल्या वर्षभरापासून चीनची सेना बॉर्डरवर गोंधळ घालत होती. पण, शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्याचा पुरावा भारतीय लष्करानं आज जारी केला आहे. चीनी सेना वादग्रस्त भागातून काढता पाय घेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. चीनी रणगाडे माघारी फिरताना स्पष्ट दिसतं आहे. लडाखच्या फिंगर 8 भागातून चीनी परत फिरले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आजच सकाळी संसदेत याबाबत माहिती दिली होती. (China take back Public Liberation Army from LAC watch video )
दोन्ही देशांचं सैन्य फॉरवर्ड भागातून माघारी जाणार असं संरक्षण मंत्री म्हणाले. चीनसोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यातून दोन्ही देशांनी वाद मिटवून माघार घेण्यावर एकमत बनवलं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.
पेंगॉंग लेकमधूनही चीनी सैन्य माघारी
गाँग लेक हा भारतासाठी महत्वाचा आहे. चीनी सैन्यानं ह्याच तळ्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात सैन्य वाढवलं होतं. आणि त्यातूनच दोन्ही देशात तणावपुर्व स्थिती निर्माण झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून ही तणावाची स्थिती आहे. आताच्या चीनच्या माघारीनं दोन्ही देशातला हा तणाव निवळण्याची चिन्हं आहेत.
गलवानमध्ये त्यादिवशी काय घडलं?
भारत-चीन यांच्या सैन्यात 16 जून रोजी झालेल्या (India-China Face Off 20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. भारत-चीनच्या सैन्याच्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत
संबंधित बातम्या :
i on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी
एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी
(China take back Public Liberation Army from LAC watch video )